Dearness Allowance Hike : आनंदवार्ता आलीच; केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात बंपर वाढ

आनंदवार्ता आलीच; केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात बंपर वाढ l 7th Pay Commission good news for central employees Dearness Allowance hiked
आनंदवार्ता आलीच; केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात बंपर वाढ l 7th Pay Commission good news for central employees Dearness Allowance hiked
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

केंद्र सरकारचे कर्मचारी (Central Government Employees) आणि पेन्शनधारकांसाठी (Pensioners) एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

महागाई भत्त्यात ३% वाढ निश्चित मानली जात आहे. आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ३४% दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) मिळू शकतो.

पोलीस बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे; देशमुख यांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात एकच खळबळ

All-India Consumer Price Index (AICPI) निर्देशांक, औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे सन २००१ नुसार, डिसेंबर २०२१ साठी निर्देशांकात एक अंकाची घट झाल्याने निर्देशांक ३६१ अंकांवर गेला आहे.

महागाई भत्त्यासाठी १२ महिन्यांचा निर्देशांक सरासरी ३५१.३३ आहे. या सरासरी निर्देशांकावर ३४.०४% महागाई भत्ता मिळू शकतो शकतो. सरकारच्या या निर्णयामुळे आणखी ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. (7th Pay Commission Latest News in marathi)

ठरलं! दहावी, बारावी परीक्षा Offlineच

मार्चनंतर होणार जाहीर

सध्या ३१ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारी २०२२ पासून ३% अधिक महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. आता एकूण महागाई भत्ता ३४% झाला आहे. ७व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, मूळ वेतनावर महागाई भत्ता दिला जातो. लवकरच त्याची घोषणा केली जाईल. मार्चनंतर त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Nashik Crime : ‘ताे’ हाडांचा सांगाडा डाॅ. सुवर्णा वाजे यांचाच; खून झाल्याचे निष्पन्न

See also  College Reopen : ठरलं! राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा गजबजणार

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  अफगाणिस्तान हादरले! काबूलमध्ये शाळेजवळ 3 मोठे बॉम्बस्फोट, 25 ठार

Share on Social Sites