
गोवा l Goa :
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly election Result) भाजपाने पणजी (Panaji) मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने पक्षाविरोधात मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Chief Minister Manohar Parrikar) यांचे बंडखोर पुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांचा पराभव झाला आहे.
भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी पणजीतून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालाय. पणजीमधून भाजपाचे बाबूश मोन्सेरात (BJP’s Babush Monserrate has won from Panaji) विजयी झालेत.
https://twitter.com/ANI/status/1501801785371262976?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1501801785371262976%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Felections%2Fgoa-assembly-elections-2022%2Fgoa-election-manohar-parrikar-son-utpal-parrikar-lost-to-bjp-antanasio-moneserrate-from-panaji-scsg-91-2835954%2F
“अपक्ष उमेदवार म्हणून मी चांगली लढत दिली. मी लोकांचे आभार मानतो. मी निकालामुळे नक्कीच निराश आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया पर्रिकरांच्या मुलाने मीडियाशी बोलताना दिली आहे. उत्पल पर्रिकरांना उमेदवारी न मिळाल्याची चर्चा देश पातळीवर झाली होती. त्यामुळे पणजी येथील निवडणूक प्रतिष्ठेचा विषय ठरला होता. (Panaji Election Result)
मोदी हैं तो…! पाच पैकी चार राज्यांत कमळाची कमाल, सायकल पंक्चर, हात अन् हत्ती दोन्हींची दाणादाण
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने दि. २१ जानेवारी रोजी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उत्पल पर्रिकर यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
https://twitter.com/ANI/status/1501819487112556550
मात्र पक्षाने त्यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारली आणि वादग्रस्त आमदार बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता.
आपल्या नैतिक मूल्यांसाठी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. मला पणजीतून उमेदवारी नाकारली, याचा अर्थ पक्षात कुणाचा तरी मला विरोध आहे. त्यामुळे मी पक्ष सोडत आहे, असं उत्पल यांनी पक्ष सोडताना म्हटलं होतं.
‘आप’ची ‘मान’ उंचावणारा Punjab King; कॉमेडियन टू CM कसा आहे ‘भगवंत’ यांचा प्रवास