मोदी हैं तो…! पाच पैकी चार राज्यांत कमळाची कमाल, सायकल पंक्चर, हात अन् हत्ती दोन्हींची दाणादाण

मोदी हैं तो...! पाच पैकी चार राज्यांत कमळाची कमाल, सायकल पंक्चर, हात अन् हत्ती दोन्हींची दाणादाण l Assembly Election Result 2022 Highlights BJP Congress BSP SP Shivsena
मोदी हैं तो...! पाच पैकी चार राज्यांत कमळाची कमाल, सायकल पंक्चर, हात अन् हत्ती दोन्हींची दाणादाण l Assembly Election Result 2022 Highlights BJP Congress BSP SP Shivsena
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

देशातील पाच राज्यांतील निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), गोवा (Goa), पंजाब (Punjab), उत्तराखंड (Uttarakhand) आणि मणिपूरमध्ये (Manipur) देशातील सत्तेची ‘सेमिफायनल भाजप’ ने जिंकली आहे. पाच पैकी चार राज्यांत भाजपने आपला करिष्मा कायम ठेवला असल्याचे सिध्द झाले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सलग दुसर्‍यांदा स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता या राज्यात पुन्हा योगीराज पाहायला मिळले.

गोवा (Goa), उत्तराखंड (Uttarakhand), मणिपूरमध्येही (Manipur) भाजपचा दबदबा कायम आहे. तिकडे पंजाबच्या (Punjab) निकालाने पूर्ण राजकारण बदलले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party)  इतर पक्षांचा सुपडासाफ केला आहे.

दृष्टीक्षेपात निकाल :

  • पाचपैकी तीन राज्यांत भाजपचे कमळ फुलले

  • गोव्यात भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर

  • पंजाबचा गड आम आदमी पक्षाने राखला

  • काँग्रेसने पंजाब गमावले

  • पंजाबचे मुख्यमंत्री चन्‍नी दोन्ही जागांवर पराभूत

  • कॅप्टन अमरिंदर सिंह, नवज्योत सिध्दू यांचा दारूण पराभव

  • गोव्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री पराभूत

  • उत्पल पर्रिकर पणजीमधून पराभूत

  • युपी, गोव्यात शिवसेनेला ‘नोटा’ पेक्षाही कमी मते

  • युपीत अखिलेश यादवांची सव्वाशे जागांवर मुसंडी

‘आप’ची ‘मान’ उंचावणारा Punjab King; कॉमेडियन टू CM कसा आहे ‘भगवंत’ यांचा प्रवास

उत्तर प्रदेशचा गड भाजपकडे

पाच राज्यांपैकी सर्वात मोठी लढाई उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) होती. ही लढाई भाजपने एकहाती जिंकली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने भाजपला (BJP) स्पष्ट बहुमत दिले आहे. भाजप 265 जागी आघाडीवर असून अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) 133 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाचा करिष्मा कायम राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. मायावती यांचा बसपा (BSP) काँग्रेस (Congress) तिसर्‍या तर मायावती यांचा बसपा चौथ्या स्थानी फेकला गेला.

Goa Election Results : पणजीत भाजपने गड राखला, उत्पल पर्रीकर पराभूत : बाबूश मोन्सेरात यांनी मारली बाजी

गोव्यात भाजप सत्ता स्थापणार

गोव्यात भाजप सलग दुसर्‍यांदा सत्ता स्थापन करणार हे आता स्पष्ट झाले आहे. गोव्यात बहुमताचा आकडा 21 इतका आहे. सध्या भाजप 20 जागी आघाडीवर असून तीन अपक्ष तसेच मगोपच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करण्याचे निश्‍चित झाले आहे. तीन अपक्ष विजयी उमेदवारांनी भाजपला समर्थन दिले आहे. अतिरिक्त संख्याबळासाठी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाशी भाजपची बोलणीही सुरु आहे. त्यामुळे आता भाजप राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. गोव्यात 14 मार्च रोजी शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1501936824687624196

See also  Dhule : 'त्या' खून प्रकरणात बापासह दोन मुलांना जन्मठेपेची शिक्षा; शिंदखेडा तालुक्यातील घटना

पंजाबात ‘आप’च्या झाडूने इतरांचा सुपडा साफ

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Assembly election) निकालामध्ये अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आप पक्षाची त्सुनामी आली आहे. आप पक्षाने पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेससह भाजपचाही सुपडा साफ केला आहे. पंजाबमधील जनतेने आप पक्षाच्या (AAP) बाजूने कौल दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पंजाबमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये 92 जागांवर आप पुढे आहे. मुख्यमंत्री चन्नी (CM Charanjit singh Channi) दोन्ही जागांवर पराभूत झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिध्दूंनाही (Congress state president Navjot Singh Sidhu) मतदारांनी पराभवाची धळ चारली आहे.

https://twitter.com/ArvindKejriwal/status/1501930041122635778

उत्तराखंडमध्ये भाजपची एकहाती सत्ता

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) भाजपने सर्व पक्षांना मागे सोडत 49 जागांवर सर्वात मोठी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे. उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नसून इतर पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami) यांच्या निवडणुकीच्या निकालाबाबत बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून कडवी स्पर्धा मिळाली. दुसरीकडे, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत (veteran Congress leader and former chief minister Harish Rawat) यांचा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

https://twitter.com/myogiadityanath/status/1501925824966332422

See also  Maharashtra Kesari 2022 : महाराष्ट्र केसरी अंतिम लढत, 20 वर्षाच्या पृथ्वीराजने कोल्हापूरचा 'दुष्काळ' धुतला
मणिपूरमध्ये भाजप सत्ता स्थापनेच्या दिशेने
मणिपूरमध्ये (Manipur) विधानसभा निवडणुकीच्या 60 जागांसाठीचे बहुते निकाल हाती आले असून यामध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकलं आहे. भाजप उमेदवार आतापर्यंत 60 पैकी 29 जागी विजयी झाले आहेत. तर काँग्रेस 09, एनपीपी 09 आणि इतर 08 जागांवर आघाडीवर आहेत.

https://twitter.com/RahulGandhi/status/1501863045609492481

जनमताचा आदर करतो : राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील पक्षाचा पराभव त्यांनी स्वीकारला आहे. जनमताचा आम्ही आदर करतो. निवडणुकीत जनतेचा कौल मिळवणार्‍यांना शुभेच्छा आहेत. निवडणुकीसाठी झटलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांचा आभारी आहे. या निवडणुकीतून आपण धडा घेऊया आणि जनतेच्या हितासाठी अशाच प्रकारे काम करूया, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.

https://twitter.com/PawarSpeaks/status/1501874498424893442

हा बदल काँग्रेसला धक्‍का देणारा : शरद पवार

पाच राज्यांतील निवडणुकांपैकी चार राज्यांमध्ये भाजपाची सत्ता होती. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती पण आज तिथे अतिशय वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. पंजाबमधला हा बदल भाजपासाठी अनुकूल नाही. हा बदल काँग्रेस पक्षाला धक्का देणारा आहे. आपने दिल्लीमध्ये दोनदा ज्या प्रकारे यश संपादन केले त्याबद्दली मान्यता दिल्लीकरांमध्ये आहे. दिल्लीतल्या कामाचा परिणाम पंजाबमध्ये झाला हे स्पष्टपणे दिसत आहे. पंजाब सोडून बाकीच्या राज्यांमध्ये सत्तेमध्ये असणार्‍यांना समर्थनाची भूमिका घेतली आहे.

https://twitter.com/AnujGaikwad10/status/1501937724189655044

See also  शुल्लक कारणावरून मुख्याध्यापकाची विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण; नाशकातील स्कॉटीश अकॅडमी शाळेतील प्रकार

Share on Social Sites