बंगळुरू l Bangalore :
बंगळुरूमधील एका शाळेसमोर मुलींच्या गटांनी एकमेकांवर हल्ला केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सर्व तरुणी शाळेच्या युनिफॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. तसेच त्यांच्यामध्ये तुफान हाणामारी होत असल्याचेही दिसत आहे. ही घटना कुठे झाली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तसेच या हाणामारीमागे नेमकं कुठलं कारण होतं, हेही कळू शकलेलं नाही. (Students From Bishop Convent School In Bengaluru Indulges Into Fist Fight, Video Viral)
बंगळुरूमधील एका प्रतिष्ठीत शाळेतील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर (Viral Video on Social Media) होत आहे. त्यामध्ये या विद्यार्थिनी एकमेकींना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ बिशप कॉन्व्हेंट स्कूलमधील (Bishop Convent School) आहे आणि हे एक ऑल गर्ल स्कूल (All Girl School) आहे. या व्हिडीओमध्ये काही विद्यार्थिनी अन्य विद्यार्थिनींचे केस ओढताना दिसत आहेत. एवढंच नाही तर मुलींचे पालकही या झगड्यात सहभागी झालेले दिसत होते.
Y'all need to even if y'all haven't already 😭😭😭 pic.twitter.com/fBbJv9CXoc
— chef (@Trexhater) May 17, 2022
दरम्यान, रिपोर्ट्सनुसार शाळेने या व्हिडीओंबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच भांडणाचं कारणही अद्याप अज्ञात आहे. मात्र या हाणामारीनंतर विद्यार्थिनींना जखमा झाल्या आहेत.
मध्य प्रदेशात OBC आरक्षणाचा मार्ग मोकळा; ‘सुप्रीम’ निर्णयाचा महाराष्ट्रालाही फायदा?
