Dhule : ‘त्या’ खून प्रकरणात बापासह दोन मुलांना जन्मठेपेची शिक्षा; शिंदखेडा तालुक्यातील घटना
येवला l Yeola :
नगर-मनमाड महामार्गावरील टोलनाका परिसरात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एकचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची सविस्तर माहिती अशी की, आज (दि. 04) बुधवार रोजी सकाळी नगर-मनमाड महामार्गवर (Nagar-Manmad Highway) टोलनाका परीसरात येवला (Yeola) बाजूने कोपरगावकडे जाणारी मालट्रक आणि कोपरगाव (Kopargaon) बाजूने येवल्याच्या दिशेला जाणारी स्विफ्ट कार यांच्यात ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरासमोर भीषण अपघात होऊन स्विफ्ट डिझायर कार क्र. MH 18 AJ 2716 मधील चालक अनिल चंद्रलाल माखिजा रा. दोंडाईचा जि. धुळे (Anil Chandralal Makhija, Dondaicha, Dhule) हे जागीच ठार झाले आहे. (Nagar-Manmad Highway Accident news) अनिल माखिजा हे दोंडाईचा शहरातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या ‘स्वामी लीलाशाह’ (Swami Lilashah) या दुकानाचे संचालक होते. त्यांच्या अचानक जाण्याने नातेवाईकांसह मित्रपरिवाला मोठा धक्का बसला आहे.
धुळे : जिल्ह्याभरात चोरीला गेलेल्या सात मोटारसायकल सह दोन अल्पवयीन अटकेत
हा अपघात इतका भीषण होता की, स्विफ्ट कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघात नंतर तात्काळ खाजगी रुग्णवाहिकेतून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आला असून पुढील कारवाई येवला पोलीस (Yeola Police) करत आहे.
Dhule : धुळे जिल्ह्यात ‘या’ कारणास्तव ११ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित