‘आयटम चाहीये, तुझे? हांss..’ म्हणत फोनवरुन सेक्सची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या विभागप्रमुखाला महिलेकडून चोप

कॉल करुन सेक्ससाठी महिलांची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या विभागप्रमुखाला महिलेने चोप दिला आहे l Woman beat shivsena worker for calling sex
कॉल करुन सेक्ससाठी महिलांची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या विभागप्रमुखाला महिलेने चोप दिला आहे l Woman beat shivsena worker for calling sex
Share on Social Sites

विरार l Virar :

विरार पूर्वेतील साईनाथ नगर (Sainath Nagar, Virar East) येथे असलेल्या शिवसेना विभाग प्रमुखाला एका महिलेने चपलेने चांगलेच हाणले आहे. जितू खाडे (Shiv Sena division head is Jitu Khade) असे या शिवसेना विभागप्रमुखाचे नाव असून त्याला रिक्षातच एका महिलेने चोप दिला आहे.

फोन कॉलवरुन सेक्ससाठी (Call Sex) महिलांची मागणी जितू खाडे करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. याच कारणाने संतप्त महिलेने जितू खाडे (Jitu Khade) याला भररस्त्यात रिक्षामध्ये चपलेनेच चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल (Shivsena Jitu Khade Viral Video) झाला आहे.

याप्रकरणी पोलिस तक्रार देखील करण्यात आली असून सध्या जितू खाडे हा फरार आहे. पोलिस याप्रकरणी आता अधिक तपास करत असून फरार जितू खाडेला शोधण्याचा प्रयत्न सुरु आहेत. पीडित महिला ही विरारमधील रहिवासी असून या महिलेने चक्क रिक्षातच शिवसेनेच्या विभागप्रमुखाला दिलेला चोप चांगलाच चर्चिला जात आहे.

Shark Tank India ची आदित्य ठाकरेंकडून दखल; नाशिकमधील स्टार्टअपला दिली ‘ही’ ऑफर

नेमका काय प्रकार?

आयटम चाहीये?, असे म्हणत एक महिला शिवसेना विभागप्रमुख असलेल्या जितू खाडे याला चपलेने रिक्षातच मारायला सुरुवात करते, असे व्हिडीओमध्ये दिसून आले आहे. पीडित महिलेने जितू खाडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. फोन कॉल करुन, सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत होता, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

याप्रकरणी विरार पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिका-याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला संशयित आरोपी जितू खाडे हा सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या त्याचा शोध घेतला जात असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

जितु खाडे, शिवसेना विभाग प्रमुख, विरार

या प्रकरणावर शिवसेनेचे काय म्हणणे आहे ?

दरम्यान, या संपूर्ण घटनेप्रकरणी शिवसेनचे पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे (Shiv Sena’s Palghar sub-district chief Dilip Pimple) यांना फोनवरून विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी या कृतीचा निषेध केला आहे. तसेच जितू खाडे असता त्यांनी या कृतीचा निषेध व्यक्त केला असून, जितू खाडेच्या कृतीला आमचा पाठिंबा नसून, वरिष्ठांशी बोलून, त्याच्यावर लगेच कारवाई केली जाणार असे सांगितले आहे. एकूणच या प्रकरणामुळे शिवसेना विभागप्रमुखाचे नाव आल्याने आता पक्षाकडून जितू खाडेवर काय कारवाई होते, यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

See also  Jalna IT Raid : 'राहुल वेड्स अंजली' चं स्टिकर लावत अधिकारी आले अन् ‘दुल्हन हम ले जायेंगे’ म्हणत 390 कोटी शोधून काढले!

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  खळबळजनक! शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशीतैशी; चक्क शौचालयात धुतली जाताहेत जेवणाची भांडी : पाहा VIDEO

Share on Social Sites