Video : पुण्यात जबर राडा; शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पडले पायरीवर

Video : पुण्यात जबर राडा; शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पडले पायरीवर l Shivsena Activists Attack on BJP leader Kirit Somaiya Pune
Video : पुण्यात जबर राडा; शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पडले पायरीवर l Shivsena Activists Attack on BJP leader Kirit Somaiya Pune
Share on Social Sites

पुणे l Pune :

पुण्यात शिवसेना (Shivsena) आणि भाजपा (BJP) कार्यकर्ते आमनेसामने आलेले पाहायला मिळाले. शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) अक्षरशः पायरीवर पडलेले पाहायला मिळाले. यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत किरीट सोमय्यांना जमावातून बाहेर काढत गाडीत बसवले.

किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये (Shivajinagar Police Station) दाखल झाले होते. त्यानंतर ते महापालिकेमध्ये आले असताना शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सोमय्यांवर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना तिथून बाजूला नेत गाडीत बसवले.

रुको जरा सबर करो; सातवी पास ‘भाऊ’ च्या न्यायालयीन कोठडीत तब्बल ‘इतक्या’ दिवसांची वाढ

पोलिसांनी किरीट सोमय्या यांना गाडीत बसवल्यानंतरही आक्रमक शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवरही हल्ला चढवला. काही कार्यकर्ते गाडीच्या समोर आले, तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या मागच्या बाजूने हल्ला केला.

सोमय्या आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार केली. तिथून पालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी ते आले असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली आणि सगळा प्रकार घडला.

चिंता वाढली; लता मंगेशकर यांच्या प्रकृती बद्दल रुग्णालयाने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

हल्ल्यावर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया (Kirit Somaiya’s first reaction to the attack)

शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी स्वतः याची माहिती देत ट्वीट केल आहे. ते म्हणाले, “माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात हल्ला केला आहे.”

दरम्यान, किरीट सोमय्या या हल्ल्यानंतर संचिती हॉस्पिटलला (Sanchiti Hospital) दाखल झालेत. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे.

१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला अखेर अटक

किरीट सोमय्या घाबरणाऱ्यांमधले नाहीत (Kirit Somaiya is not one of those who are afraid)

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) म्हणाले, “मुद्दे संपले की माणसं गुद्यावर येतात. पायाखालची वाळू घसरली की सभ्यतेचा बुरखा फाटून मूळ चेहरा समोर येतो. किरीट सोमय्या घाबरणाऱ्यांमधले नाहीत. त्यांचा प्रकरणे काढण्याचा इतिहास आहे. अनेकांना त्यांनी घरी पाठवले आहे.”

अख्ख्या महाराष्ट्राचे सरकार भाजपच्या कार्यकर्त्यांना गावोगावी त्रास देत आहे, असाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

See also  Today's Horoscope : जाणून घ्या आजचे तुमचे राशी मंथन अन् पंचांग, मंगळवार, 02 ऑगस्ट 2022

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Today’s Horoscope : 'असा' असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन, बुधवार, दि. 21 सप्टेंबर 2022

Share on Social Sites