
नागपूर l Nagpur :
नागपूरच्या उमरेड पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या ब्राह्मणीतील ‘न्यूड डान्स’ (Women Nude Dance Brahmin) प्रकरणात विशेष तपास पथकाने (Special Investigation Teams (SIT) आणखी सात जणांना अटक केली. या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या आता दहा पोहचली आहे.
यापूर्वी पोलिसांनी चंद्रशेखर ऊर्फ लाला प्रभूजी मांढरे (३५), सूरज निळकंठ नागपुरे (२८), अनिल दमके (४८), श्रीकृष्ण चाचरकर (३५), बाळू नागपुरे (वय ४०), अरुण नागपुरे (३७), हेमंत नागपुरे (३१), नंदू रामदास मांढरे (२९, सर्व रा. ब्राह्मणी), बेताब बाबाजी सरोज (२५, रा. दिघोरी), अरशद अफजल खान (२६, रा. छोटा ताजबाग (Tajbagh) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आधी चंद्रशेखर, सूरज व अनिलला अटक केली होती.
Union Budget 2022-23 : वेतनधारकांसाठी सरकारची करमुक्तीची भेट, पाच लाखांपर्यंतचा PF टॅक्स-फ्री?
ब्राह्मणीमध्ये शंकरपटाच्या आयोजनानंतर रात्री मंडपात नागपुरातील ऍलेक्स डान्स शोच्या महिला कलाकारांचा अश्लील नृत्याचा कार्यक्रम होत होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला (Video Viral on social media) झाला.
या प्रकाराची दखल घेत पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर (Superintendent of Police Vijay Kumar Magar) यांनी नागपूर विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड (Pooja Gaikwad, Sub-Divisional Police Officer, Nagpur Division) यांच्या नेतृत्वात SIT ची स्थापना केली.
एसआयटीच्या पथकाने (दि. २२) शनिवारी रात्रभर आरोपींची धरपकड करून दहा जणांना अटक केली. सर्वांना पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची एक दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.