नाशिक l Nashik :
कॉस्टिंग (Costing), मॅनेजमेंट अकाउंटिंग (Management Accounting), माहिती विश्लेषण (Information Analysis), टॅक्सेशन (Taxation) आणि इतर शाखांमध्ये छाप पाडण्यासाठी उत्तम संधी. दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटांट्स ऑफ इंडिया (Institute of Cost Accountants of India (ICMAI) ही एक संसदेच्या कायद्यांतर्गत वैधानिक संस्था असून यासंस्थेपामर्फत शिक्षणाचे संयोजन केले जाते, याच संस्थेमार्फत काही जीएसटी (GST) आणि कॉस्ट ऑडिट (Cost Audit) या क्षेत्रात काही कायदेशीर अधिकारही दिलेले आहेत.
सीएमए ही प्रोफेशनल डिग्री (Professional Degree) असून या क्षेत्रात आपल्याला काय संधी आहेत हे थोडक्यात या लेखात सांगण्यात आले आहे. आजची सीएमए ही डिग्री 2011 पूर्वी कायद्यात बदल होण्याआधी ‘कॉस्ट अँड वर्क अकाऊंटट’ (Cost & Works Accountant (ICWA) नावाने ओळखली जायची. सरकारने कार्यक्षेत्र लक्षात घेऊन कायद्यात बदल केला व ‘आयसीडब्लूए’ (ICWA) हे नाव बदलून सीएमए (CMA) म्हणजेच ‘कॉस्ट अँड वर्क अकाऊंटट’ (Cost & Management Accountant) असं केलं.
हुश्शह! निकाल तर लागला.. पण आता पुढे काय? ‘हे’ आहेत 10वी नंतरचे ‘बेस्ट करियर ऑप्शन’
सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा झाली आहे. त्यामुळे प्रत्येक बिझनेसला मार्केटमध्ये आपलं स्थान टिकवणं हे एक प्रकारे आवाहन आहे. त्यासाठी खालील तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.
1. वस्तूची किंमत (Price of goods)
2. वस्तूची गुणवत्ता (Quality of goods)
3. वस्तूपासून व्यवसायाला होणारा नफा (Profit from business to goods)
आपल्या मालाची क्वालिटी कमी न करता वस्तूची किंमत कमीतकमी ठेवणे आणि त्यापासून प्रॉफिट कमवणे हे जागतिक पातळीवर सगळ्याच व्यवसायांसमोरचं मोठं आवाहन आहे.
यासाठी सीएमएचं स्थान सर्वात महत्वाचं आहे कारण कॉस्ट अकाऊंटंट व्यवसायाला लागू होतील अशा विविध प्रकारच्या टेक्निक वापरून कॉस्टिंग करतात आणि व्यवसायात नक्की कुठे फायदा होत आहे आणि कोणत्या प्रॉडक्ट्स मध्ये तोटा होत आहे. ह्या गोष्टींचं अगदी मुळापर्यंत जाऊन विश्लेषण केले जाते आणि त्यावर निर्णय व्यवसायाच्या बाबतीत निर्णय घेतला जातो.
Maharashtra Rain Update : सावधान! पुढील ‘इतके’ दिवस अतिमुसळधार पावसाचे, हवामान खात्याने दिला इशारा
विविध देशात आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सीएमए आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत नुसतं कॉस्टिंग पुरतं मर्यादित न राहता व्यवसायात अनेक क्षेत्रात जसं की उद्योगात अप्रत्यक्ष कर, उपलब्ध साधन सामग्रीचा योग्य वापर, खरेदी-विक्री, एचआर (HR), स्टोअर्स (Stores), आंतरराष्ट्रीय टॅक्सेशन (International Taxation), इंटरनॅशनल फायनान्स (International Finance) या खात्यांमध्ये उच्चपदार कार्यरत आहेत.
अगदीच उदाहरण घ्यायचं ठरलं तर ऑइल अँड गॅस (Oil and Gas), वीज (Steel), कोळसा (Coal), स्टील (Steel), सिमेंट (Cement) या क्षेत्रातील अनेक नामांकित खाजगी तसेच सरकारी निम-सरकारी कंपन्यांमध्ये अगदी चेअरमन, कार्यकारी संचालक, सीइओ (CEO), सीएफओ (CFO) पदावर सीएमए कार्यरत आहेत.
तयारीला लागा! २०२२-२३ वर्षात IT क्षेत्रात येणार नोकऱ्यांची लाट; तब्बल ३,६०,००० फ्रेशर्सना मिळणार Job
उद्योगांसोबत सर्व्हिस सेक्टर मध्येही वेगळी छाप सीएमएची आहे जसे की, बॅंकिंग (Banking), आयटी (IT), टेलिकॉम (Telecom) या क्षेत्रात महत्वाच्या स्थानावरती सीएमए कार्यरत आहेत. येणाऱ्या काळात सीएमए हे अर्थव्यवस्थेचं भविष्य ठरणार आहे. कॉमर्समध्ये सीए (CA) आणि सीएस (CS) सोबत सीएमए (CMA) हा उत्तम पर्याय असून विद्यार्थी आकर्षित होत आहेत.
सीएमएचा अभ्यासक्रम तीन टप्प्यात विभागलेला असून बारावीच्या वर्गानंतर पहिला टप्पा फौंडेशन करून पुढच्या इंटरमिजीएटला (Intermediate) प्रवेश मिळतो तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना दुसऱ्या म्हणजेच इंटरमीजीएट आणि इंटरमीजीएट नंतर फायनल टप्प्यात प्रवेश मिळतो. हा कोर्स करताना विद्यार्थ्यांना कम्प्युटर कौशल्य, संवाद कौशल्य याचं काही प्रमाणात प्रशिक्षण दिले जाते.
‘त्यांचा’ सत्तेचा फॉर्म्युला ठरलायं! 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री पदे, केंद्रातही वाटा अन् बरचं काही…
याचसोबत कमवा आणि शिका तत्वावर कमीत कमी कोर्स चालू असतानाच 3 वर्ष (1.5 वर्ष कंपल्सरी) इंडस्ट्रियल प्रॅक्टिकल ट्रेनिंग करणं गरजेचं आहे ज्यातून विद्यार्थी काय शिकला आणि प्रत्यक्षात काय काम चालते याचा अनुभव मिळतो त्याच सोबत स्टायपेंड मिळावा याची तरतूद संस्थेने केलेली आहे.
कोर्सचा कालावधी खालील प्रमाणे आहे (विषयांचे ग्रुप) :
1. फौंडेशन – 6 महिने (1 ग्रुप 4 विषय)
2. इंटरमिजीएट – 1 वर्ष (2 ग्रुप 8 विषय)
3. फायनल – 1 वर्ष (2 ग्रुप 8 विषय)
अभ्यासक्रमात खालील विषयांचा प्रामुख्याने समावेश असतो :
1. इकॉनॉमिक्स (Economics)
2. अकाऊंटंसी (Accountancy)
3. कॉस्ट अकाउंटिंग (Cost accounting)
4. मॅनेजमेंट अकाउंटिंग (Management accounting)
5. डायरेक्ट आणि इंडायरेक्ट टॅक्स (Direct and indirect taxes)
6. फायनान्स मॅनेजमेंट (Finance Management)
7. बिझनेस व्हॅल्यूएशन (Business Valuation)
8. कॉर्पोरेट लॉ (Corporate Law)
सीएमए हे अत्यंत कमी खर्चिक आणि कमी खर्चात उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण मिळवण्याचं साधन आहे, कोर्स लागणारा एकूण खर्च अंदाजे ४५,००० इतका येतो. CMA झाल्यानंतर लगेचच एक चांगल्या पदावर काम करण्याची संधी उपलब्ध होते.
पदवी मिळाल्यानंतर संस्थेकडून कॅम्पसचे आयोजन केले जाते, ज्यात बहुविध उद्योग, सरकारी, निम सरकारी, खाजगी कंपन्या सहभागी होत असतात. 2022च्या आकडेवारीनुसार सरासरी 10 लाख तर उच्चांकी 27.50 लाखांपर्यंत वार्षिक पगार मिळवण्यात विद्यार्थ्यांना यश आले आहे.
: सीएमए भूषण उत्तम पागेरे, अध्यक्ष, नाशिक शाखा, दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटांट्स ऑफ इंडिया
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
हुबळीमध्ये भीषण अपघात : 8 जण जागीच ठार, 28 जखमी; मृतांमध्ये 6 महाराष्ट्रातले
महागाईचा भोंगा! मोडला ‘इतक्या’ वर्षांचा रेकॉर्ड; सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या
आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल आंबियाची हत्या; सामन्या दरम्यान झाडल्या गोळ्...
Timepass 3 box office collection : दगडू आणि पालवीची लव्हस्टोरी 'हिट' की 'फ्लॉप'?...