
पुणे l Pune :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (Maharashtra State Secondary and Higher Secondary) म्हणजेच दहावी (Standard 10th) आणि बारावीच्या (Standard 12th) परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहे.
दरम्यान, कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात येतील अशी चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (State Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुणे येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
दहावीची लेखी परीक्षा (Standard 10th Written Examination) १५ मार्च तर बारावीची लेखी परीक्षा (Standard 12th Written Examination) ०४ मार्चपासून सुरु होणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा (Standard 12th Practical Examination) १४ फेब्रुवारी ते ०३ मार्चपर्यंत तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा (Standard 10th Practical Examination) २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षा ऑफलाइन (Offline Exam) माध्यमातून होणार आहे.
करोना आणि ओमिक्रॉन संसर्गाच्या (Omicron Virus) पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्यात, अशी सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Minister of State for School Education Bachchu Kadu) यांनी दिली आहे. राज्यातील शिक्षण उपसंचालकांच्या बैठकीत बच्चू कडू यांनी या यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. राज्यातील कोरोना (Corona Virus) आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे ठरेल का असा प्रश्न पालकांच्या मनात पडला आहे.
कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रामध्ये पाठविण्यास धजावणार नाहीत. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला अशी चर्चा सुरु आहे.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले कि, दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. याबाबतचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) या घेतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.