एकनाथ शिंदे गटाचं अखेर ‘हे’ नाव ठरलं! थेट सेनेच्या अस्तित्वाला आव्हान
मुंबई l Mumbai :
सत्तेचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत असून सुरतेतील (Surat) आमदार आसामच्या गुवाहटीला पोहोचल्यानंतर रात्री पासून मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि पर्यायानं महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi government) सरकारला थेट चॅलेंज केल आहे. (Maharashtra Politics LIVE) जवळपास 41 आमदार (Maharashtra MLA) सोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सेनेला भलं मोठं भगदाड पाडलं. स्वत: प्रतोद नेमला आणि खरी शिवसेना (Shiv Sena) त्यांच्यासोबत असल्याचं म्हटलं. यानंतर राज्यातील सत्ताकेंद्र बदलल्याचं स्पष्ट झाल आहे.
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. #HindutvaForever
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
तसेच काल रात्रीच उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’वरून (Varsha residence) ‘मातोश्री’कडे (Matoshri residence) सहपरिवार प्रस्थान केलंय. आणि तुमचं म्हणणं असेल तर शिवसेना प्रमुखपदही सोडतो, असं म्हणाले. यानंतर आणखी ट्वीस्ट येणार हे स्पष्ट झालंय. (Maharashtra Political Crisis)
शिवसेना आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर आणि रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जैस्वाल गुवाहाटीच्या रेडीसन ब्लु हॉटेलमध्ये पोहोचले.@saamTVnews @SakalMediaNews pic.twitter.com/Q7RgXyiZKs
— Omkar Wable (@omkarasks) June 23, 2022
एकनाथ शिंदे यांनी सर्व सूत्र हातात घेतल्याचं आता पर्यंत स्पष्ट झाले आहे. त्यांनी कायदेशीरपणे जाण्याचा प्रयत्न केला आहे. ईडीच्या (ED) कचाट्यात सापडलेले प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) सध्या शिंदेंसोबत आहेत. सूनील प्रभूला (Sunil Prabhu) बघू, असं ते म्हणाले.
आज भी हमारी पार्टी मजबूत है। किस हालात और किस दबाव में उन लोगों ने हमारा साथ छोड़ा उसका खुलासा जल्द होगा… हमारे संपर्क में लगभग 20 विधायक हैं और जब वे मुंबई आएंगे तब इसका खुलासा होगा। जो ED के दबाव में पार्टी छोड़ता है वह बालासाहेब का भक्त नहीं हो सकता: शिवसेना नेता संजय राउत pic.twitter.com/HlwnX8UYXK
— ANI_HindiNews (@AHindinews) June 23, 2022
भाजपकडून (BJP) सत्ता समीकरणाच्या हालचालींना वेग
एकनाथ शिंदे गटाला भाजपची मोठी ऑफर (BJP offer for Eknath Shinde) असल्याची चर्चा आहे. राज्यात 8 कॅबिनेट मंत्रिपदं (Cabinet ministerial) आणि 5 राज्यमंत्रिपदं (State ministerial) आणि केंद्रातही (Central Government) वाटा मिळण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदेनाही (Shrikant Shinde) केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता वाढली आहे. तर राज्यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असू शकतात. संजय राठोड (Sanjay Rathore), दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासारख्या शिवसेनेच्या गटातील व्यक्तींची महामंडळांवरही वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे.
आज मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहे..राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतोय, मुंबईत यावं आणि राजभवनावर घेऊन जावं !
— Uddhav Thackeray (@uddhavthackeray) June 22, 2022
41 खासदार, 7 अपक्ष आणि 12 खासदार!
आमदारांच्या बंडखोरीची चर्चा असतानाच आता बारा खासदारही शिंदे यांच्यासोबत जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर येत आहे. शिवसेनेचे 18 खासदार असून बारा खासदार शिंदे यांच्यासोबत जाणार असतील तर हा ठाकरेंसाठी आणखी मोठा धक्का असेल. त्यामुळे आता ठाकरे पुढे काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
#WATCH | Shiv Sena leaders arrive at the family residence of CM Uddhav Thackeray 'Matoshree' in Mumbai, amid #MaharashtraPoliticalCrisis pic.twitter.com/CMollN6Q2n
— ANI (@ANI) June 23, 2022
संख्याबळ शिंदेंकडे… खरी शिवसेना कोणाची?
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीला यश आलं आल्याचं दिसतंय. सेनेचे जवळपास 41 आमदार शिंदे गटात सामील झाल्याचं कळतंय. मुंबई (Mumbai), खान्देश (Khandesh), कोकण (Konkan) आणि मराठवाड्यातील (Marathwada) मोठं संख्याबळ एकत्र करण्यात शिंदेंचा प्लॅन यशस्वी झालाय. आता ठाकरे यांना सहकार्य करणारे फक्त 14 आमदार उरले आहेत. याशिवाय तत्काळ सहा अपक्ष, यामध्ये नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar), आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal) आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) गटातले अन्य काही आमदार शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत.
…तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार; CM उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे चेहरे शिंदे गटात!
आणखी चार आमदारांसोबत आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal) गुवाहाटी (Guwahati) पोहोचत असल्याची माहिती मिळतीय. त्यामुळे शिंदे यांनी सांगितलेला 40 आमदारांचा आकडा आता पूर्ण होणार असल्याचं दिसतंय.
-
शिवसेना समर्थित अपक्ष आमदार आशिष जैसवाल (MLA Ashish Jaiswal) गुवाहाटीसाठी निघाल्याची माहिती
-
शिवसेना समर्थित अपक्ष आमदार आशिष जैसवाल नॅाटरिचेबल होते
-
मंत्री टक्केवारी मागत असल्याचा गौप्यस्फोट करुन उडवून दिली होती खळबळ
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आमदार म्हणून जैसवाल यांची ओळख