
मुंबई l Mumbai :
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि शक्ती कपूरचा (Shakti Kapoor) मुलगा सिद्धांत कपूरबद्दल (Bollywood actress Shraddha Kapoor brother Siddhanth Kapoor) एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात सिद्धांतला बेंगळुरू पोलीसांनी (Bangalore Police) ताब्यात (Siddhanth Kapoor Detained) घेतले आहे. सिद्धांतवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे, पोलीसांची ही कारवाई बेंगळुरूच्या एमजी रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये पार्टीवर छापा टाकताना करण्यात आली. ड्रग्ज घेतल्याप्रकरणी सिद्धांत कपूरसह एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात (Siddhant Kapoor accused in Drugs Case) आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग्ज चाचणीत सर्व जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
Karnataka | Actor Shraddha Kapoor's brother Siddhanth Kapoor detained during police raid at a rave party in a Bengaluru hotel, last night. He is among the 6 people allegedly found to have consumed drugs: Bengaluru Police pic.twitter.com/UuHZKMzUH0
— ANI (@ANI) June 13, 2022
बॉलीवूडमध्ये डग्सचे प्रकरण नवीन नाही. याआधी शाहरुख खानचा (Superstar Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानचेही (Aryan Khan) नाव समोर आले होते. मात्र नंतर ईडीने आरोपपत्रात आर्यनला क्लीन चिट दिली होती. आता ड्रग्ज प्रकरणात शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरचे नाव जोडले गेले आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंगळुरू पोलिसांनी ड्रग्ज पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याला ताब्यात घेतले आहे. एमजी रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये सिद्धांत आणि इतर सहा जण पार्टी करत होते असे सांगण्यात येत आहे.
Video : स्वतःशीच शुभमंगल सावधान! अखेर ‘तो’ बहुचर्चित आत्मविवाह संपन्न; आता तयारी हनिमूनची
या प्रकरणी बेंगळुरू पोलीसांचे एक वक्तव्यही समोर आले आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला काल रात्री (दि. 12 जून) बेंगळुरूमधील एका हॉटेलमधील रेव्ह पार्टीत (Rave Party) पोलीसांनी छापा टाकला होता असे पोलीसांनी सांगितले आहे. ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी सिद्धांत कपूरसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Will @khanumarfa & @RanaAyyub tweet that Shakti Kapoor's son Siddhanth Kapoor is being harassed just because he is a HINDU?
— Thakur Jitesh Singh (@JiteshSingh_83) June 13, 2022