![Kshama Bindu Marriage स्वतःशीच शुभमंगल सावधान! अखेर 'तो' बहुचर्चित आत्मविवाह संपन्न; आता तयारी हनिमूनची l Vadodara Gujarat's Kshama Bindu Finally Weds Herself](https://ekhabarbat.com/wp-content/uploads/2022/06/Kshama-Bindu-Marriage-673x381.jpg)
वडोदरा l Vadodara :
स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन देशभरात चर्चेत आलेल्या गुजरातच्या (Gujarat) क्षमा बिंदूने अखेर बुधवारी स्वतःशी लग्न केले. क्षमाने दि. 11 जून रोजी स्वतःशी लग्न करण्याची घोषणा केली होती, मात्र देशभरातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर तिने ठरलेल्या तारखेच्या 3 दिवस आधीच लग्न केले. (Vadodara Gujarat’s Kshama Bindu Finally Weds Herself)
Kshama Bindu of Gujarat weds herself as announced earlier pic.twitter.com/Xsscy0ueYC
— Alok Kumar (@dmalok) June 9, 2022
सर्व रितीरिवाजांनुसार लग्न
क्षमा बिंदूने स्वतःला दिलेले वचन पूर्ण केले आणि एका खास विवाह सोहळ्यात स्वतःशीच लग्नगाठ बांधली. लग्ना दरम्यान हळदी-कुंकवाचे विधी झाले, मेहेंदी सेरेमनी देखील झाली. वडोदराच्या गोत्री (Gotri, Vadodara) येथील घरात क्षमाने हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. मात्र, या लग्नात मुलगा किंवा लग्न लावणारा पंडित नव्हते. कुठलाही गाजावाजा न करता क्षमाने कुटुंबातील जवळचे व्यक्ती आणि काही खास मित्रांच्या उपस्थिती लग्न केले.
ये गुजरात की लड़की की ख़ुद से शादी करने की बात कुछ समझ नहीं आई। भई जब अपने ही साथ रहना है तो शादी शब्द ही क्यों दिमाग़ में आया ? ये तो मुझे ना फेमिनिज़्म लगा ना अध्यात्म लगा ना ही बुद्धिमता और ना आधुनिकता । शायद कुछ और होगा जो मैं समझ नहीं पाई हों ।#KshamaBindu #Gujarat
— Sonal Dahiya (@_SonalDahiya) June 9, 2022
…म्हणून बदलली तारीख
भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह असल्याचे बोलले जात आहे. क्षमाने यापूर्वी दि. 11 जून रोजी तिच्या लग्नाची घोषणा केली होती. तेव्हापासून त्यांच्या घरी सतत लोकांची वर्दळ होती. याबाबत त्यांच्या शेजाऱ्यांनी विरोध केला होता. यातच कोणीतरी दि. 11 जून रोजी तिच्या घरी येऊन वाद निर्माण करेल, यासाठी तिने तीन दिवस आधी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
Went to the wedding today..😉
India's first sologamy…
Vadodara's Kshama Bindu marries herself..😁@vineet8372
@moksha2k6 @BhumitKathiriya
😂😂😂 pic.twitter.com/i6Bw3Ohx4k— dileep 🇮🇳 (@dileep56684) June 9, 2022
मंदिरात लग्न करण्याला होता विरोध
क्षमाने आधी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजप नेत्याच्या (BJP leader) विरोधानंतर त्यांनी घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Congress leader Milind Deora) यांनीही अशाप्रकारच्या लग्नाला विरोध दर्शवला होता. लग्न लावणाऱ्या पंडितानेही अशा एकल लग्न किंवा स्व-विवाहाचा विधी करण्यास नकार दिला. यानंतर क्षमाने टेपवर मंत्र वाजवून लग्न करण्याचा निर्णय घेतला.
औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर आता करू शकतो पण…;उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
असा विचित्र निर्णय का घेतला?
स्वतःशी लग्न करण्याबाबत क्षमाने सांगितले की, तिला लग्न करण्याची कधीच इच्छा नव्हती, पण वधू बनण्याचे स्वप्न होते. त्यामुळेच तिने स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. क्षमा बिंदू एका खासगी कंपनीत नोकरी करते. ‘स्व-विवाह म्हणजे स्वतःसाठी आणि स्वतःवर बिनशर्त प्रेम करण्याची वचनबद्धता आहे. सामान्यपणे लोक प्रेम असलेल्या व्यक्तीशी लग्न करतात. माझे स्वतःवर प्रेम आहे, म्हणून मी स्वतःशीच लग्न केलंय,’ असे क्षमा म्हणाली.
पैगंबर मोहम्मद प्रकरण भोवलं; भाजपच्या नुपूर शर्मांसह ‘या’ 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
हनिमूनसाठी जाणार गोव्याला! (Kshama going to Goa for honeymoon)
क्षमाचे आई-वडील खुल्या विचारांचे आहेत, या निर्णयास त्यांचाही पाठिंबा आहे. त्यांनी लग्नात क्षमाला आशीर्वादही दिला. आता लग्नानंतर ती हनिमूनला गोव्याला (Goa Honeymoon) जाणार आहे. देशात ‘सोलो लग्न’ (Solo Marriage) करणारी ती पहिलीच मुलगी असावी, असेही तिने सांगितले.
सनी लिऑनीला ‘टफ’ देण्यासाठी आणखी एका ‘पॉर्न स्टार’ची बॉलिवूडमध्ये एंट्री