धक्कादायक! महिलेनेच आखला प्लॅन; अल्पवयीन मुलीवर ८ जणांकडून बलात्कार

धक्कादायक! महिलेनेच आखला प्लॅन; अल्पवयीन मुलीवर ८ जणांकडून बलात्कार l 8 men raped minor girl in Patan Satara district Maharashtra
धक्कादायक! महिलेनेच आखला प्लॅन; अल्पवयीन मुलीवर ८ जणांकडून बलात्कार l 8 men raped minor girl in Patan Satara district Maharashtra
Share on Social Sites

सातारा l Satara :

सातारा जिल्ह्यातील पाटण (Patan) येथील अल्पवयीन मतिमंद मुलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने नेऊन ८ जणांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

यात एका महिलेचाही सहभाग असल्याचे पाेलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून ९ आरोपींना १२ तासांच्या आत अटक करण्यात आली आहे. या संतापजनक घटनेमुळे पाटण तालुका हादरला आहे. विशेष म्हणजे गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई (Minister of State for Home Affairs Shambhuraje Desai) यांच्या पाटण तालुक्यातील ही घटना आहे.

दोन महिन्यांतील पाटण तालुक्यातील काळीज पिळवटून टाकणारी ही दुसरी घटना आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने गावातीलच एका अल्पवयीन मुलगी मतिमंद असल्याचा फायदा घेत दि. २७ जानेवारी २०२२ ते दि. १८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान बाहेर फिरायला जाण्याचे, बाहेर खाऊपिऊ घालण्याचे तसेच पैसे देण्याचे आमिष दाखवून तिला बाहेर घेऊन जात होती.

तिने अल्पवयीन मुलीला पाटण व आजूबाजूच्या परिसरातील लोकांची ओळख करून देऊन त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. पाटण व आजूबाजूच्या परिसरातील आठ लोकांनी या अल्पवयीन व मतिमंद मुलीवर वेळोवेळी व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला.

याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पाटण पोलिस ठाण्यात (Patan Police Station) लैंगिक अत्याचार व बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ (Sexual Abuse and Child Protection Act 2012) चे कलम ४, ६, १७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील सर्व नऊ आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांचा शोध घेऊन त्यांना बारा तासांत अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पाटण पोलिसांनी केला. पोलिस अधीक्षकांच्या आदेशावरून पुढील तपास महिला पोलिस अधिकारी करीत आहेत. या अत्याचार प्रकरणात आणखीही कुणी सहभागी आहे का, याबाबत तपास केला जात असल्याचे ठाणे इन्चार्ज चौखंडे यांनी सांगितले.

धुळे : एकाच कुटुंबातील पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, सर्वांची प्रकृती चिंताजनक

See also  Corona Vaccine : आता २ ते ६ वर्षांच्या मुलांना लवकरच मिळणार Corona ची लस

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites