नाशिकचा गड जिंकण्यासाठी पुन्हा ‘संकटमोचक ‘… रावल यांची गच्छंती

नाशिकचा गड जिंकण्यासाठी पुन्हा 'संकटमोचक '.. रावल यांची गच्छंती l BJP Girish Mahajan charge of Nashik Muncipal Corporation Election
नाशिकचा गड जिंकण्यासाठी पुन्हा 'संकटमोचक '.. रावल यांची गच्छंती l BJP Girish Mahajan charge of Nashik Muncipal Corporation Election
Share on Social Sites

नाशिक l Nashik :

महापालिका निवडणुकीची ‘संकटमोचक’ गिरीश महाजनांवर (Girish Mahajan) जबाबदारी भाजपा (BJP) नेतृत्वाकडून देण्यात आल्याने नाशिकमध्ये आता गिरीश महाजनांचा राजकीय करिश्मा पाहायला मिळणार आहे.

भाजपाची नुकतीच मुंबईत एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते आहे. भाजपाच्या प्रभारी असलेल्या जयकुमार रावल (Jaykumar Raval) यांच्यावर पक्षात नाराजी असल्याने गिरीष महाजनांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी सुध्दा मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली त्यामुळे नाशिकमधील महापालिकेची निवडणुक (Nashik Muncipal Corporation Election) अत्यंत चुरशीची ठरेल असे वाटते आहे. नाशिकमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) आणि गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागणार अशी देखील राजकीय गोटात चर्चा आहे.

Russia Ukraine War : रशियन हल्ल्याचा दुसरा दिवस; युद्धात ८०० हून अधिक रशियन सैनिक ठार, ३० टँक आणि ७ गुप्तचर विमानेही नष्ट युक्रेनचा दावा

पक्षातील फुट टाळण्यासाठी निर्णय

नाशिक महापालिकेची निवडणुक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असल्याने तिथे आतापासून अनेक पक्षांनी कंबर कसायला सुरूवात केली आहे. त्यामुळे तिथे महत्त्वाच्या व्यक्तीच्या हातात सुत्र असावीत असे प्रत्येक पक्षाला वाटतंय. भाजपाच्या नेत्यांमध्ये अंतर्गत वाद असल्याचे कानावर आल्याने पक्ष श्रेष्ठींनी मला पालिकेची माळ गिरीष महाजन यांच्या गळ्यात घातली आहे. त्यामुळे पक्षात फुट पडणार नाही याची काळजी देखील घेतली आहे. भाजपाच्या प्रभारी असलेल्या जयकुमार रावल यांच्यावर पक्षात नाराजी असल्याचे पक्ष श्रेष्ठींच्या कानावर आले होते. त्यामुळे तिथे होणा-या निवडणुकीच्या तोंडावर पक्षात फुट पडणार याची काळजी महाजन यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाने जेष्ठ नेते गिरीश महाजन यांची नाशिक प्रभारी पदी नेमणूक केल्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. मी स्वतः त्यांना प्रभारी करावे म्हणून आग्रह धरला होता. हा निर्णय पक्षाने माझ्याशी चर्चा करूनच घेतला. या निवडीमुळे पक्षाला नाशिकमध्ये बळ मिळेल. सहप्रभारी म्हणून गिरीश महाजनांच्या खांद्याला खांदा लावून भाजपला पुन्हा एकदा निर्भेळ यश मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

: जयकुमार रावल, सह प्रभारी, भाजपा, नाशिक

See also  खान्देशच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! पठ्ठ्याने साडेतीन एकरांत फुलवली चक्क अफूची शेती, गोण्या भरून पोलीस ही दमले

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा औरंगाबाद येथून LIVE

Share on Social Sites