मुंबई l Mumbai :
अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketaki Chitale) ही नेहमीच सोशल मीडियावरील आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असते. अभिनेत्री यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त विषयावर भाष्य करुन टीकेची धनी ठरली होती. आता पुन्हा एकदा ‘शरद पवारांना’ उद्देशून एक काव्य स्वरुपातील मजकूर शेअर करत ती वादात सापडली आहे. अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्यानं एक नवा वाद निर्माण झाला आहे. केतकी चितळेने यावेळी अत्यंत अनादरकारक भाषेत लिखाण केलेलं आहे. (Ketaki Chitale Facebook Post on Sharad Pawar)
केतकी चितळेने यावेळी लिहीताना सर्व मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळत आहेत. केतकीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये
“तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरकसगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
Actress #KetakiChitale has learnt from #BJP leaders of #Maharashtra that the best way to gain cheap and free publicity is to make derogatory statements on Sharad Pawar Saheb.
They all have tried and failed, this lady will experience the same.
Hope God grants her some sensibility.— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) May 14, 2022
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll” अशा शब्दातील एक कविता शेअर केलेली आहे. ॲडव्होकेट नितीन भावेंनी (Advocate Nitin Bhave) ही कविता लिहील्याचं म्हटलं आहे.
खळबळजनक! स्वामी समर्थ केंद्रात 50 कोटींचा अपहार; खान्देशातील सेवेकर्याची थेट एसपींकडे तक्रार
दरम्यान, या पोस्टवरती सोशल मीडियावर आलेल्या कमेंटवर नजर टाकली असता, “केतकी ताई आपली लायकी आहे का बोलायची. पवारसाहेब कुठे आपण कुठं परत गुन्हा दाखल झाला की, रडू नका…” असं म्हटलं आहे. तर काहींनी म्हटलंय की, “तिच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही. कारण नाव कुठं घेतलंय यात. कविता लिहिनाराच वकील आहे.” असं यामध्ये म्हटलं आहे.
चितळेंची चाले फक्त भाकरवाडी I केतकी तर चार आण्याची पुडी II
कितीही केल्या तुम्ही टांगा वरी I तरी या वाघाने बसवले शेकडा अन सहा घरी..!!#ketakichitale pic.twitter.com/JQZW3ewpSu— NcpYouthSpeaks Offical (@NcpYouthoffical) May 14, 2022
