
नाशिक l Nashik :
पुणे प्रस्तावित ३३५.१५ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाला केंद्र सरकारच्या वित्त आयोगानेही (Central government’s finance commission) आपल्या वाट्याकडील २० पैकी १९.६ टक्के निधीला मान्यता दिली आहे. (Nashik-Pune Railway) राज्य शासनाने आपल्या हिश्श्याच्या ३२ कोटींच्या निधीला आधीच मान्यता दिलेली असून समभागातून ६०% निधी उपलब्ध आहे.
त्यामुळे आता नीती आयोग (Policy Commission) आणि केंद्र सरकारच्या कॅबिनेटकडून (Cabinet of the Central Government) अंतिम मान्यता मिळाल्यानंतर रेल्वेमार्गाचे प्रत्यक्ष काम चार महिन्यांत सुरू होऊ शकणार आहे. या रेल्वे मार्गामुळे नाशिक (Nashik), अहमदनगर (Ahamadnagar) आणि पुणे (Pune) हे तीन जिल्हे एकमेकांना जोडले जातील आणि नाशिक-पुणे प्रवासाचे अंतरही अवघ्या दाेन तासांवर येणार आहे.
या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तीन वर्षांपूर्वी दोन कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर झाला होता. त्यानंतर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. परंतु, राज्य व समभागातील निधी मंजूर झाल्यानंतर काही महिन्यांपासून केंद्राच्या २० टक्के हिश्श्याचा निधी प्रलंबित होता.
१६,०३९ कोटींंचा प्रकल्प (Total 16,039 crore project)
दाेन विकसनशील शहरांना जाेडणारा हा देशातील कमी खर्चिक, पहिला ब्राॅडगेज रेल्वे मार्ग (Broad gauge railway line) व सेमी हायस्पीड काॅरिडाेर (semi high speed corridor) असेल. भूसंपादनासाठी २ हजार ९८१ काेटी तर बांधकाम व व्याजापाेटी ७१६ काेटी रुपये अपेक्षित आहे. रेल्वे मंत्रालय (Ministry of Railway) २० टक्के म्हणजे ३ हजार २०८ काेटी तर राज्य शासन ३ हजार २०८ काेटी रुपये आणि वित्तीय संस्थांकडून ९ हजार ६२३ काेटी रुपयांचे कर्ज घेतले जाणार आहे.
भयंकर! Google वर ‘कॉल गर्ल’ सर्च केलं अन्…, पुढे जे घडलं ते वाचून बसेल धक्का
अशी असतील स्थानके
या मार्गावर पुणे जिल्ह्यात १२, नगर जिल्ह्यात ६ आणि नाशिक जिल्ह्यात चास (Chas), दाेडी (Dodi), सिन्नर (Sinnar), माेहदरी (Mohdari), शिंदे (Shinde) आणि नाशिकराेड (Nashikroad) अशी ६ स्थानके असतील. सध्या २०० किलाेमीटर प्रतितास असलेली गती २५० किलाेमीटर प्रतितास वाढवता येणार आहे. प्रत्येक ७५० मीटर अंतरावर, रेल्वे मार्गाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला येण्या-जाण्याची सुविधा असेल. जोडले जातील आणि नाशिक-पुणे (Nashik-Pune) प्रवासाचे अंतरही अवघ्या दाेन तासांवर येणार आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तीन वर्षांपूर्वी दोन कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर झाला होता. त्यानंतर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. परंतु, राज्य व समभागातील निधी मंजूर झाल्यानंतर काही महिन्यांपासून केंद्राच्या २० टक्के हिश्श्याचा निधी प्रलंबित होता.
शेतकऱ्यांना मिळणार मोठा मोबदला (Farmers will get huge benefit)
नाशिक-पुणे लोहमार्गात जाणाऱ्या जमिनींचा नेमका किती मोबदला मिळणार याविषयीची चर्चा बाधित शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन (Maharashtra Railway Infrastructure Development Corporation (MRIDC) ने गेल्या तीन वर्षांत झालेल्या गाव पातळीवरील खरेदी खताच्या सरासरीच्या तुलनेत मोठा मोबदला देण्याविषयी आपली सकारात्मकता जिल्हा प्रशासनाकडे दर्शवली आहे.यामुळे बाधित शेतकऱ्यांना आपल्या जमिनींचा अपेक्षित मोबदला मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
चिकन आणि अंडी खाणाऱ्यांनो सावधान! राज्यात Bird Flu चा शिरकाव
हा होईल लाभ
पुणे, नाशिक या शहरांवर नाेकरी, राेजगाराकरिता भार वाढताे आहे. मात्र हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर शहरांवरील स्थलांतरितांचा भार कमी होणार असून गावातूनच लाेक नाेकरी, राेजगारासाठी जाणे-येणे पसंत करू शकतील. दाेन्ही शहरात वाहन उद्योग मोठ्या प्रमाणावर असून त्यातील अंतर कमी हाेईल व नाशिकच्या उद्याेगांना माेठा फायदा हाेईल व स्थानिक व्हेंडर्सला पुण्याच्या उद्याेगांशी व्यवहार सुलभ हाेऊ शकणार आहे.
सततच्या पाठपुराव्याला आता यश येत आहे. आधी सर्वेक्षण निधी मंजूर करुन घेतला. वित्त आयोगाच्या या मान्यतेनंतर आता हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी नीती आयोग आणि कॅबिनेटकडे जाणार असून दोन महिन्यांत प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरच तीन ते चार महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
: हेमंत गाेडसे, खासदार
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
यशवंत जाधव यांचे ‘मातोश्री’ प्रेम डोळ्यात पाणी आणणारे; २ कोटी, ५० लाखांचे घड्याळ...
पुन्हा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री; राज्यात ...
मालट्रक आणि कारच्या समोरासमोरील धडकेत दोंडाईच्यातील व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू
मशिदींच्या भोंग्यांना 3 मे पर्यंत अल्टीमेटम, ऐकले नाही तर… राज ठाकरेंचा थेट इशार...