मोठी कारवाई! 9 जणांसह पाकिस्तानी बोट पकडली, तब्बल 280 कोटींचे ‘हेरॉईन’ जप्त

मोठी कारवाई! 9 जणांसह पाकिस्तानी बोट पकडली, तब्बल 280 कोटींचे 'हेरॉईन' जप्त l ATS Gujarat and India Coast Guard apprehended a Pakistani boat with 9 crew
मोठी कारवाई! 9 जणांसह पाकिस्तानी बोट पकडली, तब्बल 280 कोटींचे 'हेरॉईन' जप्त l ATS Gujarat and India Coast Guard apprehended a Pakistani boat with 9 crew
Share on Social Sites

गांधीनगर (गुजरात) l Gandhinagar (Gujarat) :

भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि एटीएस गुजरात (ATS Gujarat) यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पाकिस्तानी बोट आणि त्यावरील 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. (A joint operation by Indian Coast Guard and ATS Gujarat has arrested a Pakistani boat and nine people on board)

KGF Chapter 2 : ‘रॉकीभाई’ ची रॉकिंग कमाई! ‘केजीएफ चॅप्टर 2’ ने पार केला कमाईचा थक्क करणारा आकडा

या कारवाईत सुमारे 280 कोटी किमतीचे हेरॉईन (Heroin) जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई अरबी समुद्रातील भारतीय हद्दीत करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या बोटीचे नाव ‘अल हज’ (Al Hajj) आहे. ही बोट पुढील तपासासाठी जखाऊ (Jakhau) येथे आणली जात असल्याचे भारतीय तटरक्षक दलाने म्हटले आहे.

भारतीय तटरक्षक दल आणि एटीएस गुजरात यांनी केलेली ही कारवाई मोठी आहे. जी बोट जप्त करण्यात आली आहे त्यातून हेरॉईन नेले जात होते. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. जखाऊ हे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील कच्छ (Kutch) खाडीवरील एक बंदर आहे. जखाऊ गावापासून हे बंदर 8 किलोमीटर अंतरावर आहे.

नुकत्याच कच्छमधील कांडला बंदराजवळ (Kandla Port) केलेल्या एका संयुक्त कारवाईत 1,300 कोटी रुपयांचे 260 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. तर गेल्या वर्षी गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथकाने (Gujarat ATS ) धडक कारवाई करत तब्‍बल 120 किलो हेरॉईन जप्‍त केले होते. मोरबी जिल्‍ह्यात (Morbi district) जप्‍त करण्‍यात आलेल्‍या या ड्रग्‍जची आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेतील किंमत 600 कोटी रुपये होती.

See also  देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेची पत्रकार परिषद थेट राजभवनातून LIVE

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला अखेर अटक

Share on Social Sites