खळबळजनक! स्वामी समर्थ केंद्रात 50 कोटींचा अपहार; खान्देशातील सेवेकर्‍याची थेट एसपींकडे तक्रार

खळबळजनक! स्वामी समर्थ केंद्रात 50 कोटींचा अपहार; खान्देशातील सेवेकर्‍याची थेट एसपींकडे तक्रार l 50 crore scam in Shree Swami Samarth Kendra Trambakeshwar Nashik
खळबळजनक! स्वामी समर्थ केंद्रात 50 कोटींचा अपहार; खान्देशातील सेवेकर्‍याची थेट एसपींकडे तक्रार l 50 crore scam in Shree Swami Samarth Kendra Trambakeshwar Nashik
Share on Social Sites

नाशिक । Nashik (ई खबरबात न्यूज नेटवर्क) :

दिंडोरीप्रणित स्वामी समर्थ केंद्राचे (Dindori Pranit Shree Swami Samarth Kendra, Nashik) प्रमुख श्रीराम खंडेराव मोरे ऊर्फ गुरूमाऊली अण्णाासाहेब मोरे (Shiram Khanderao More, Gurumauli Annasaheb More) यांनी त्र्यंबकेश्‍वर (Trimbakeshwar) येथील स्वामी समर्थ गुरूपीठात (Swami Samarth Gurupith) 50 कोटींपेक्षा अधिक पैशांचा अपहार केल्याची तक्रार धुळे (Dhule) येथील स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी अमर पाटील (Amar Patil) यांनी त्र्यंबकेश्‍वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) केली आहे.

याबाबत त्यांनी नाशिकचे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील (Nashik District Superintendent of Police Sachin Patil) यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले असून, मोरे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे समस्त सेवेकर्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली असून, दिवसभर याच विषयावर सेवेकर्‍यांसह नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती. स्वामी समर्थ सेवा केंद्राचा जिल्हयासह राज्यात मोठा मोठा सेवेकरी वर्ग आहे. केंद्राच्या माध्यमातून त्र्यंबकेश्‍वर येथे गुरूपीठ उभारण्यात आले असून, या गुरूपीठात विविध कार्यक्रमांची नेहमीच रेलचेल असते.

‘ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोण रे तू…’; शरद पवारांना उद्देशून अभिनेत्री केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट

अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरूपीठ ही एक नावाजलेली धर्मदाय संस्था असून, या संस्थेशी विविध कार्यक्रम उपक्रमांच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने सेवेकरी जोडले गेले आहेत. या संस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे विनानिविदा झाली असून, त्यात निधीचा गैरव्यवार झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. अण्णासाहेब मोरे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करताना पाटील यांनी ऑडीटचे रिपोर्टही जोडले आहेत.

या तक्रारीवरून पोलीस काय भूमिका घेतात याकडे सार्‍यांचे लक्ष वेधले असून, या घटनेने अवघे वातावरण घुसळून निघाले आहे. अ. भा. स्वामी समर्थ गुरूपीठ या संस्थेचे अण्णासाहेब मोरे हे अध्यक्ष (Annasaheb More, President) आहेत. नारायण दामोदर काकड उपाध्यक्ष (Narayan Damodar Kakad, Vice President), चंद्रकांत श्रीराम मोरे सचिव (Chandrakant Shriram More, Secretary), नितीन श्रीराम मोरे उपसचिव (Nitin Shriram More, Deputy Secretary) आहेत. शिरीष मोरे (Shirish More), निंबा शिरसाठ (Nimba Shirsath) हे पदाधिकारी आहेत.

दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू : खान्देशातील दुर्दैवी घटना

कुठल्याही धर्मदाय संस्थेचे पाच हाजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे काम करताना कायदेशीर तरतुदीप्रमाणे कलम 36 नुसार धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक असते. तसेच त्या कामांच्या निविदा काढणे गरजेचे असते. मात्र 2009 ते 2021 दरम्यान वेळोवेळकामे झाली असून, त्यातून लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

श्रीराम उर्फ अण्णासाहेब मोरे यांनी 2009 ते 2021 या कालावधीत समर्थ गुरूपीठ या संस्थेचा स्वत:च्या फायद्यासाठी दुरूपयोग करीत 50 कोटी 68 लाख 69 हजार 221 रुपयांचा अपहार केल्याचे अमर पाटील यांनी केलेल्या तक्रारीत नमून केले आहे.

सेवेकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

त्र्यंबकेश्‍वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरूपीठात 50 कोटींपेक्षा अधिक पैशांचा अपहार झाल्याची आणि हाअपहार खुद्द गुरूमाऊली म्हणविणार्‍या अण्णासाहेब मोरे यांनी केल्याचे वृत्त पसरल्याने लाखोंच्या संख्येने असलेल्या सेवेकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. अण्णासाहेब मोरे यांच्यासह संबंधितांनी या वृत्ताचा आणि घटनेचा निषेध करीत हे धादांत खोटे असल्याचे सांगितले आहे तर दुसरीकडे त्यांच्याच सेवेकर्‍याने पुराव्यासह अपहार झाल्याचा दावा करीत पोलीसांत तक्रार दाखल केल्याने सेवेकर्‍यांमधील संभ्रमात अधिक भर पडली आहे.

श्रीराम उर्फ अण्णासाहेब मोरे यांच्यासह इतर सात जणांनी सन 2009 ते 2021 पर्यंत त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ या धर्मदाय संस्थेचा मोठ्या प्रमाणात दुरुउपयोग केला. तब्बल यातून 50 कोटी 68 लाख 69 हजार 221 रुपयांचा अपहार केला आहे. ही शासनाची, भक्तांची व जनतेची खूप मोठी फसवणूक आहे.

: अमर पाटील, तक्रारदार, धुळे

तक्रारदारांनी वैयक्तिक अथवा तत्सम द्वेषापोटी हे आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपात तथ्य असते तर आतापर्यंत धर्मदाय आयुक्त अथवा पोलीस निरीक्षकांनी आमच्यावर कारवाई केली असती. आमच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत आणि त्यांची सर्व कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत. ट्रस्टचे सर्वच कामकाज आतापर्यंत नियमानुसारच झालेले आहे. ऑडिटच्या बाबतीतील तक्रारींतही कोणतेही तथ्य नाही.

: गिरीश मोरे, व्यवस्थापक, दिंडोरी दरबार, त्रंबकेश्वर

अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ संस्थेच्या ऑडिटमधील अनियमीततेसंदर्भात तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने धर्मादाय आयुक्त कार्यालयास पत्र देत या संदर्भातील त्यांचा अहवाल मागवला आहे. लेखापरीक्षणात काही त्रुटी आहेत का किंवा त्यातून अपहार झाला आहे का, झाला असल्यास किती व कसा जाहला आहे. यासंदर्भातील तथ्य तपासून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

: सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

See also  GST ची ‘रेड’... भिंतीत लपवल्या 10 कोटींच्या नोटा आणि 19 किलो चांदीच्या विटा!

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites