
मुंबई l Mumbai :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak attack) निवास्थानावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते (Advt. Gunaratna Sadavarte) अखेर 18 दिवसांनी तुरुंगातून बाहेर आले आहेत.
सदावर्तेंना दि. 8 एप्रिल रोजी मुंबईतील त्यांच्या निवास्थानातून सिल्व्हर ओक येथील हल्ल्यामागे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे माथी भडकवल्याचा आरोप करत अटक करण्यात आली होती.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1518921870518620160
मात्र, आता अखेर तब्बत 18 दिवसांनी सदावर्ते बाहेर आले आहे. तुरुंगातून सुटका होताच सदावर्तेंनी हा ‘हिंदुस्थान्यांचा विजय’ असल्याचे म्हटले आहे.
तुरुंगातून बाहेर पडताना सदावर्ते म्हणाले की, या कठीण काळात माझा मित्र परिवार, हिंदुस्थानातील जनता आणि कष्टकरी बांधन माझ्यासोबत राहिले. तसेच येथून आमचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम जेजे करता येईल ते आम्ही करू.
https://ekhabarbat.com/elon-musk-to-buy-twitter-for-44-billion/