
नाशिक l Nashik :
अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने घरातच खून केला. विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह पेठ मधील कोटंबी घाटात (Kotambi Ghat, Peth) येथे फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सचिन उर्फ काळू शामराव दुसाने असे मृताचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Local Crime Branch) कौशल्य पणाला लावत या प्रकरणी मृताची पत्नी व संशयित शोभा सचिन दुसाने, तिचा प्रियकर दत्तात्रय शंकर महाजन, खुनासाठी एक लाख रुपयांची सुपारी घेणारे संदील किट्टू स्वामी, अशोक मोहन काळे, गोरख नामदेव जगताप, पिंटू मोगरे उर्फ बाळासाहेब मारुती मोगरे, मुकर्रम जाहीर अहमद शेख यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Superintendent of Police Sachin Patil) यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. पेठच्या कोटंबी घाटात अनोळखी मृतदेह आढळला होता. पोलिसांनी तपासाअंती खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याचा तपास सुरू असताना अधीक्षक पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. मृतदेह निफाड तालुक्यातील गणेशनगर (Ganesh nagar, Niphad) येथील सचिन दुसाने या व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे; देशमुख यांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात एकच खळबळ
पथकाने गावात तपास केला असता त्यांच्या पत्नीचे दत्तात्रय महाजन याच्या सोबत अनैतिक संबंध (Immoral relations) असल्याचे समजले. त्यावर पाेलिसांनी संशयित बांधकाम व्यावसायिक महाजन यास ताब्यात घेतले. सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र त्याला पाेलिसी खाक्या दाखवल्या नंतर त्याने शोभासह त्याचे मित्र संदीप किट्टू स्वामी (रा. सिंहस्थ नगर), अशोक मोहन काळे (रा. दत्त नगर, चुंचाळे), गोरख नामदेव जगताप (रा. राणा प्रताप चौक), पिंटू मोगरे उर्फ बाळासाहेब मारुती मोगरे (रा. निफाड), मुकर्रम जहिर अहेमद शहा (रा. अंबड, आयटीआय लिंक रोड) यांच्या मदतीने २२ जानेवारी रोजी गणेशनगर येथे सचिन दुसानेचा खून करून मृतदेह त्याच्याच कारमध्ये (एमएच १३०८) मध्ये टाकून घाटात फेकून दिला.
नाशकातील सातपूरच्या कारखान्यात भीषण अग्नितांडव!; पहिला मजला जळून खाक
दाेन कारने (MH १५ DM ८६४३) आणि (MH ०४ DN ३५९३) कारने निफाड येथे येऊन सुपारीचे १ लाख रुपये घेतल्याचे तपासात निष्प्न झाले. पथकाने दोन्ही कार जप्त केल्या. दुसाने याची कार भंगार व्यावसायिकाला विकल्याचे निदर्शनास आले.
Nashik Municipal Election 2022 : निवडणुकीचा धुराळा उडणार; नाशिक महापालिकेची ‘अशी’ असेल प्रभाग रचना
निरीक्षक हेमंत पाटील (Inspectors Hemant Patil), रामभाऊ मुंढे, संजय गोसावी, प्रभाकर पवार, नितीन मंडलिक, हनुमंत महाले, सतिश जगताप, वसंत खांडवी, प्रविण सानप, सुनील पानसरे, बंडू ठाकरे, सुधाकर बागूल, हेमंत गरुड, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई केली.