Ahmedabad Serial Blast Case : एक तासात २१ स्फोट घडवले, इतिहासात पहिल्यांदाच ३८ जणांना फाशी

एक तासात २१ स्फोट घडवले, पहिल्यांदाच ३८ जणांना फाशी l 2008 Ahmedabad serial bomb blast case Special-court pronounced death sentence to 38 convicts
एक तासात २१ स्फोट घडवले, पहिल्यांदाच ३८ जणांना फाशी l 2008 Ahmedabad serial bomb blast case Special-court pronounced death sentence to 38 convicts
Share on Social Sites

अहमदाबाद l Ahmedabad :

गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad, Gujarat) येथे २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणात एकूण ४९ दोषी होते त्यापैकी ३८ जणांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. (Special Court pronounces death sentence to 38 convicts in 2008 Ahmedabad serial bomb blast case)

विशेष न्यायालयाने ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याचवेळी सर्व ४९ दोषींना (Unlawful Activities (Prevention) Act (UAPA) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने ४९ जणांनाच दोषी ठरवले होते तर २८ जणांची निर्दोष मुक्तता केली होती.

या दोषींच्या शिक्षेच्या कालावधीबाबत सोमवारी (दि. १४) सरकारी विकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानंतर आज न्यायालयाने ३८ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

ही साखळी बॉम्बस्फोटाची घटना दि. २६ जुलै २००८ रोजी घडली होती. यादिवशी अहमदाबाद नगर पालिका क्षेत्रातील (Ahmedabad Municipal Area) तब्बल २१ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. हे सर्व बॉम्बस्फोट केवळ एका तासात घडले होते. या स्फोटाने संपूर्ण देश हादरला होता.

चिकन आणि अंडी खाणाऱ्यांनो सावधान! राज्यात Bird Flu चा शिरकाव

या हल्ल्यात ५६ निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्ये २० तर सुरतमध्ये (Surat) १५ गुन्हे दाखल केले होते. संबंधित गुन्ह्यातील सर्व आरोपी एकाच कटाचा भाग असल्याने सर्व गुन्हे मर्ज करून एकत्रित खटला भरवण्यात आला होता.

नाशिक-पुणे रेल्वेबाबत खुशखबर! लवकरच कामाला प्रारंभ हाेणार; हेमंत गोडसेंच्या पाठपुराव्याला यश

यानंतर दि. २८ जुलै रोजी गुजरात पोलिसांची (Gujarat Police) एक विशेष टीम तयार करण्यात आली होती. या पोलीस पथकाने अवघ्या १९ दिवसांत ३० दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर उर्वरित दहशतवाद्यांना वेळोवेळी अटक करण्यात आली.

अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिदीनच्या (Indian Mujahideen Terrorist) याच दहशतवाद्यांनी जयपूर (Jaipur) आणि वाराणसीमध्ये (Varanasi) देखील बॉम्बस्फोट घडवून आणला होता.

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. २७ जुलैला सूरतमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवण्याचा कट आखला होता. पण टायमरमध्ये बिघाड झाल्यामुळे हे स्फोट होऊ शकले नाही. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल ७७ जणांना अटक केली होती. यातील ४९ जणांना गुजरात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यापैकी ३८ जणांना आज (दि. १८) रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

भयंकर! Google वर ‘कॉल गर्ल’ सर्च केलं अन्…, पुढे जे घडलं ते वाचून बसेल धक्का

See also  राज्यसभा निवडणूक 2022 : धनंजय महाडिक यांनी मैदान मारले; संजय पवार चितपट, शिवसेनेला जबर धक्का, महाविकास आघाडीची 10 मते फुटली

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  खळबळजनक! स्वामी समर्थ केंद्रात 50 कोटींचा अपहार; खान्देशातील सेवेकर्‍याची थेट एसपींकडे तक्रार

Share on Social Sites