
हैदराबाद l Hyderabad :
हैदराबादमध्ये (Hyderabad) एका मोठ्या रेव्ह पार्टीचा (Rave party in Hyderabad) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 148 जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात अनेक बड्या सेलिब्रिटींच्या मुलांचा समावेश आहे.
पोलिसांनी रविवारी (दि. 03) पहाटे हैदराबादमधील फाइव्ह स्टार हॉटेलच्या पबवर छापा टाकून घटनास्थळावरून अमली पदार्थ जप्त केले आहे.
https://twitter.com/EAvinash1106/status/1510678259557711881
याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, पबमध्ये पार्टी करणाऱ्या 148 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात आली. या पार्टीमध्ये टॉलिवूडशी (Tollywood) संबंधित काही लोक आणि सेलिब्रिटींच्या मुलांचा समावेश आहे. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून कोकेन (Cocaine) आणि इतर मादक (Drugs) पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
टॉलिवूड अभिनेता नागा बाबूची (Tollywood actor Naga Babu) मुलगी आणि अभिनेत्री निहारिका कोनिडेला (Actress Niharika Conidella) आणि गायक राहुल सिप्लीगंज (Singer Rahul Sipligunj) हे देखील पार्टीत उपस्थित होते. पार्टी करताना आढळलेल्यांमध्ये आंध्र प्रदेशच्या माजी पोलीस (Andhra Pradesh Police) अधिकाऱ्याची मुलगी आणि तेलगू देसम पार्टी (Telugu Desam Party TDP) अधिकाऱ्याचा समावेश होता.
https://twitter.com/SharpindiansTv/status/1510593009066610688