चिकन आणि अंडी खाणाऱ्यांनो सावधान! राज्यात Bird Flu चा शिरकाव

चिकन आणि अंडी खाणाऱ्यांनो सावधान! राज्यात Bird flu चा शिरकाव l Bird Flu in Maharashtra confirmed Shahapur Tehsil Thane Mumbai
चिकन आणि अंडी खाणाऱ्यांनो सावधान! राज्यात Bird flu चा शिरकाव l Bird Flu in Maharashtra confirmed Shahapur Tehsil Thane Mumbai
Share on Social Sites

ठाणे l Thane :

राज्यातील करोनाचे संकट आता कुठेतरी दूर होत असतानाच, एक नवे संकट उभे ठाकले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या (Mumbai) जवळील ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूने (Bird flu in Maharashtra) शिरकाव केला आहे.

शहापूर तालुक्यातील (Shahapur taluka) का पोल्ट्रीतील शेकडो कोंबड्या बर्ड फ्लूने दगावल्या आहे. कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूच्या संसर्गाने झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती मिळत आहे.

यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोल्ट्रीपासून एक किलोमीटर परिसरातील जवळपास तब्बल २५ हजारांहून अधिक कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1494517668174770176

ANI च्या वृत्तानुसार, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात वेहळोली गावात एका पोल्ट्री फार्ममधील १०० हून अधिक कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहे. अचानक हा प्रकार घडला. बर्ड फ्लूची भीती असल्याने कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश जे. नार्वेकर (District Collector Rajesh J. Narvekar) यांनी दिली.

भयंकर! Google वर ‘कॉल गर्ल’ सर्च केलं अन्…, पुढे जे घडलं ते वाचून बसेल धक्का

वेहळोली गावाजवळील (Vehloli village) एका पोल्ट्री फार्ममधील शेकडो कोंबड्या काही दिवसांपूर्वी दगावल्या होत्या. याबाबत ठाणे जिल्हा प्रशासनाने सांगितले की, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा पशुसंवर्धन विभागाला (District animal Husbandry Department) देण्यात आल्या. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.

नाशिक-पुणे रेल्वेबाबत खुशखबर! लवकरच कामाला प्रारंभ हाेणार; हेमंत गोडसेंच्या पाठपुराव्याला यश

याबाबत ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले की, कोंबड्यांचा मृत्यू हा एच5एन1 (H5N1 Avian Influenza) ने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत केंद्रीय मंत्रालयालाही माहिती देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Ahmedabad Serial Blast Case : एक तासात २१ स्फोट घडवले, इतिहासात पहिल्यांदाच ३८ जणांना फाशी

नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी

राज्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. ठाण्यातील शहापूर तालुक्यामधील एका पोल्ट्री फार्ममधील शेकडो कोंबड्या दगावल्या आहेत. त्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आगामी काही दिवसांत पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिसरातील जवळपास २५ हजार कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात येणार आहेत, पुढील काही दिवसांत याबाबत कार्यवाही सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

See also  ...अन् किर्तनकार बाबाचा Porn Video असा झाला तुफान व्हायरल; खरं कारण आलं समोर

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  प्रतीक्षा संपली! KTM RC 390 चे नवीन मॉडेल लाँच; जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरचं काही

Share on Social Sites