मन सुदृढ असले तरच स्वास्थ्य चांगले राहते : ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी; ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमांचे आयोजन

मन सुदृढ असले तरच स्वास्थ्य चांगले राहते : ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी; ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमांचे आयोजन l Organizing programs on occasion of World Yoga Day by Brahma Kumaris Sanstha Nashik
मन सुदृढ असले तरच स्वास्थ्य चांगले राहते : ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी; ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमांचे आयोजन l Organizing programs on occasion of World Yoga Day by Brahma Kumaris Sanstha Nashik
Share on Social Sites

नाशिक l Nashik (वि. प्र.)

आज व्यक्ती हेल्थ कॉन्शस (Health Conscious) झाला आहे. प्रत्येक वेळेस काय खावे काय खाऊ नये हे तो बघत असतो. शरीर स्वास्थ्य चांगले रहावे, आजारी पडू नये, यासाठी तो काळजी घेतो. परंतु आज या सर्व बाबींचा सोबतच मन सुद्धा सुदृढ राखणे खूप गरजेचे आहे. मन जर सुदृढ असले तर स्वास्थ्य सुद्धा चांगले राहते. मात्र मन कमकुवत असले कमजोर असले द्विधा मनस्थिती असले तर स्वास्थ्य सुद्धा खराब होते, स्वास्थ् ढासळू शकते. यासाठी मनाला सुदृढ ठेवणारा राजयोगा मेडिटेशन (Rajyoga meditation) प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. ब्रह्माकुमारी संस्थेच्या सर्व सेवा केंद्रांवर हा राजयोग मेडिटेशन कोर्स (Rajyoga meditation Cource) निशुल्क उपलब्ध असून प्रत्येकाने या कोर्सचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दिदीजी (Rajyogini Brahmakumari Vasanti Didiji) यांनी केले आहे.

ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध शाखांमार्फत शरीर व मन स्वस्थ राहण्यासाठी प्राणायाम योगासन व राजयोग मेडिटेशनचे कार्यक्रम घेतले जात आहेत याच श्रुंखलेत म्हसरूळ (Mhasrul) येथील स्थानीय ब्रह्माकुमारी मुख्य सेवा केंद्रात प्रभू प्रसाद सभागृहात महिलांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी वासंती दीदीची अध्यक्षीय संबंधात बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली याप्रसंगी डॉक्टर सोनखासकर (Dr. Sonkhaskar), नगरसेविका वत्सलाताई खैरे (Corporator Vatsalatai Khaire), योग शिक्षिका डॉक्टर मनीषा कापडणीस (Yoga teacher Dr. Manisha Kapdanis), ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी, ब्रह्माकुमारी वीणा दीदी, ब्रह्माकुमारी पूनम दीदी, ब्रह्माकुमारी सरला दीदी आदी मान्यवर उपस्थित होते.

हुश्शह! निकाल तर लागला.. पण आता पुढे काय? ‘हे’ आहेत 10वी नंतरचे ‘बेस्ट करियर ऑप्शन’

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित के एस बी के वावरे महाविद्यालयाच्या (KSBK Wavre College) प्राचार्य डॉक्टर सोनखासकर यांनी सांगितले की आज आपणास समाजा शिवाय पर्याय नाही. कोरोना महामारी ने ‘राव पासून रंका’ पर्यंत सर्वांना एका लाईनीत आणलेले आहे. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योगाचे महत्त्व अधोरेखित होते. जो आरोग्यदायी असेल तोच सुखी होऊ शकतो म्हणूनच योगाचे महत्त्व सर्व जनतेपर्यंत आपल्याला पोहोच व्हायलाच पाहिजे यातूनच सुखी समाजाची निर्मिती होऊ शकते असे मत डॉक्टर सोनखास कर यांनी याप्रसंगी मांडले.

नगरसेविका व महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश महिला कोर कमिटीच्या (Maharashtra Congress Pradesh Mahila Core Committe) नवनियुक्त सदस्य वत्सलाताई खैरे यांनी ओम शांती (Om Shanti) परिवारात आल्यावर प्रफुल्लित वाटते, येथे येऊन आत्म्याची बॅटरी चार्ज होते, अधिकाधिक वेळ ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात घालवायला पाहिजे असेही मत वत्सलाताई यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

4G झाले जुने आता येणार 5 जी, 10 पट वेगाने मिळणार सेवा; मंत्रिमंडळ बैठकीत स्पेक्ट्रम लिलावास मंजूरी, ‘हे’ होणार फायदे

कोरोना काळात कोरोना च्या रुग्णांना भेटुन औषधोपचार सोबतच हा भगवंताचा प्रसाद आहे यामुळे तुम्ही लवकर बरे होणार, मनात हिम्मत ठेवा भगवंताची आठवण करा असे सांगून दवा सोबत दुवा कशी कामी आली हेही वत्सलाताईंनी याप्रसंगी स्वा:नुभव व्यक्त केले. कोपरगाव Kopargaon() येथून खास उपस्थित ब्रह्माकुमारी सरला दीदी यांनी सांगितले की, कोणताही विषय चिंतेचा तेव्हाच बनतो जेव्हा आपण त्याला चिंतेचा बनवतो. आज गृहिणी भोजन बनविताना किंवा कोणालाही पाणी देताना भगवंताचे स्मरण करत नाही बरेच वेळेस त्यांच्या मनात नकारात्मक भाव नकारात्मक विचार चालत असतात या विचारांचा प्रभाव भोजन खाणारे पाणी पिणार यांच्या मनावर होत असतो त्यामुळे प्रत्येकाने भोजन बनविताना प्रभू स्मरण करताना करत किंवा स्मृतीचे गीत लावून शुद्ध अंतकरणाने भोजन बनवायला हवे त्याचप्रमाणे आपल्या मुलांना पाणी देताना दूध देताना किंवा कोणते लिक्विड देताना त्यावर प्रथम ईश्वरीय शुभ संकल्पांचे प्रकंपन टाकून असे पाणी दिल्यास त्या प्रकारची वाणी तयार होते असे ही सरला दिदी यांनी नमूद केले.

कार्यक्रमात ब्रह्माकुमारी वीणा दीदी यांनी सर्वांना अंतर मनाची सफर घडवून, मेडिटेशनचे महत्त्व सांगितले. सर्व सभा या मेडिटेशनने तल्लीन झाली होती. ब्रह्मकुमारी पुष्पा दीदी यांनी आभार प्रदर्शन तर सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी केले. स्वागत नृत्य कुमारी श्वेताने तर ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी पुष्प द्वारे स्वागत केले. कार्यक्रमात शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यात दहावी व बारावीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले अशा ब्रह्मकुमारी परिवारातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

See also  'त्या' भोंगळ कारभारावर चाप बसावा अन्यथा...; पिंपळनेर शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites