शिवसेनेवर शोककळा!; बाळासाहेब ठाकरेंचे सहकारी, सच्चे शिवसैनिक सुधीर जोशी यांचे निधन

शिवसेनेवर शोककळा!; बाळासाहेब ठाकरेंचे सहकारी, सच्चे शिवसैनिक सुधीर जोशी यांचे निधन l shivsenas senior leader sudhir joshi passes away mumbai
शिवसेनेवर शोककळा!; बाळासाहेब ठाकरेंचे सहकारी, सच्चे शिवसैनिक सुधीर जोशी यांचे निधन l shivsenas senior leader sudhir joshi passes away mumbai
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी (Senior Shivsena leader Sudhir Joshi passed away) यांचे आज (दि. १७) दु:खद निधन झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena chief Balasaheb Thackeray) यांचे सहकारी आणि सच्चे शिवसैनिक अशी सुधीर जोशी यांची ओळख होती.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1494277731072180225

वयाच्या ८१व्या वर्षी राहत्या घरी त्यांचं निधन झाले. सुधीर जोशी यांना जानेवारीमध्येच कोरोनाची बाधा (Corona Positive) झाल्यामुळे मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Nashik Crime : कुलसचिव पिता, डॉक्टर पुत्राचा निर्घृण खून, दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरले : ‘अशी’ झाली गुन्ह्याची उकल

त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. त्यानंतर आज त्यांची आज प्राणज्योत मालवली. सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. शिवसेना पक्ष संघटनेत त्यांची महत्वाची भूमिका राहिली.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर माधव देशपांडे, शाम देशमुख, बळवंत मंत्री हे प्रमुख नेते बाळासाहेबांशी जोडले गेले. पुढे मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या दोघांनी शिवसेना वाढवण्यासाठी बाळासाहेबांसोबत मोठे काम केले.

शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत शिवसेना नेते म्हणून त्यांनी काम केले. १९७२ मध्ये ते मुंबईचे महापौर (Mayor, Mumbai) झाले. पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि युतीच्या काळात शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

लवकरच बस हवेत उडताना दिसणार, गडकरींचे भरसभेत जनतेला आश्वासन

See also  Maharashtra Collages Reopening : ठरलं! शाळांनंतर आता कॉलेज 'या' तारखेपासून पुन्हा गजबजणार

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  इंधन दरवाढीची झळ बांधावर, शेतकऱ्यांना फटका : मशागतीचा खर्च वाढला

Share on Social Sites