नवी दिल्ली l New Delhi :
देशभरातील १०१२ इतर रेल्वे गाड्या रद्द (Trains Canceled) करण्यात आल्या आहेत. देशातील अनेक भागात थंडी आणि धुक्याने कहर केला असून, त्यामुळे गाड्या सतत रद्द केल्या जात आहेत. आज मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अप फास्ट मार्गिकेवर दु. १२ वाजून ३० मिनिटांनी मेगाब्लॉक (Train Megablock) सुरू होईल आणि ०२ वाजून ३० मिनिटांनी संपेल. या मेगाब्लॉकच्या दरम्यान अप (Up) आणि डाऊन (Down) दिशेला धीम्यामार्गीकेवर लोकल धावतील.
मेगा ब्लॉकच्या दरम्यान ठाणे स्टेशनच्या (Thane Station) दोन नंबर प्लॅटफॉर्मवर एक्सप्रेस आणि मेल (Mail Train) गाड्या थांबणार नाहीत, असे मध्य रेल्वे (Central Railway) ने सांगितले आहे. आज रविवार, २३ जानेवारी रोजी मध्य रेल्वे ठाणे (Central Railway) आणि दिवा रेल्वे (Diva Railway Station) स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर १४ तासांचा पायाभूत सुविधांसाठी ब्लॉक करण्यात येत आहे.
या दरम्यान ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर २ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक आहे. जुनी लाईन सध्याच्या फास्ट लाईनशी जोडण्यासाठी आणि ठाणे-दिवा ५व्या आणि ६व्या लाईनच्या संदर्भात क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी हे केले जात आहे.
मुंबईच्या या स्थितीबरोबर देशात वाहतूक करणाऱ्या इतर रेल्वे गाड्या देखील थंडी आणि धुक्यांमुळे या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलले जात आहे, तर काही वळवल्या जात आहेत. तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर त्याआधी जाणून घ्या तुमच्या ट्रेनची स्थिती काय आहे. आज १०१२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ८ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, तर १० गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
रेल्वेने आज कोणत्या गाड्या रद्द केल्या आहेत. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी वेबसाइट https://enquiry.indianrail.gov.in/mntes किंवा तुम्ही NTES App ची मदत घेऊ शकता. जिथे तुम्हाला ट्रेन नंबर टाकून ट्रेनची संपूर्ण माहिती मिळेल. याशिवाय, तुम्ही पूर्ण किंवा अंशतः रद्द केलेल्या गाड्यांची यादी देखील पाहू शकता.
