पुणे l Pune :
इयत्ता 10 वी, 12 वीच्या परीक्षेचा निकाल (SSC, HSC Results 2022) लवकरच लागणार असून या परीक्षेची पेपर तपासणी जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे दहावीचा निकाल दि. 20 जूनपर्यंत तर, बारावीचा दि. 10 जूनला लागणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) दिली आहे.
खळबळजनक! विद्यार्थी पुन्हा कोरोना व्हायरसच्या विळख्यात; शाळेतील तब्बल 64 जण ‘पॉझिटिव्ह’
दरवर्षी मे (May) महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर केले जातात, यंदा दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होताच राज्यातील शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.
HSC,SSC result by june 10 & 20
Allaying fers of delay the state education board said Class 12 results will be declared by June 10 and Class 10 results by June 20. Teachers have finished checking all answer sheets, and moderation work is in progress
— Roshan Yadav (@RoshanY50788063) April 30, 2022
तसेच कायम विनाअनुदानित शाळा संघटनेच्या असंख्य प्रतिनिधींनी दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे न तपासता ते परत केले होते. यामुळे या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात हेाती. मात्र राज्य शिक्षण मंडळाने नियोजन केल्याने या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीचे काम सुरूळीत सुरू होते.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
यशवंत जाधव यांचे ‘मातोश्री’ प्रेम डोळ्यात पाणी आणणारे; २ कोटी, ५० लाखांचे घड्याळ...
Today’s Horoscope : जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशी मंथन, रविवार, 07 ऑगस्ट 2022
...तर अशा शाळांची मान्यता रद्द होणार; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
Twitter युजर्स लक्ष द्या! 'हे' केल्यास Elon Musk सस्पेंड करणार तुमचे अकाउंट, Blu...