दुर्दैवी! दोन वेळा जीवदान… अखेर ‘त्या’ ने संपवलीच जीवनयात्रा

दुर्दैवी! दोन वेळा जीवदान... अखेर 'त्या' ने संपवलीच जीवनयात्रा l Youth committed suicide in Kadwa River Pimpalgaon Baswant Nashik
दुर्दैवी! दोन वेळा जीवदान... अखेर 'त्या' ने संपवलीच जीवनयात्रा l Youth committed suicide in Kadwa River Pimpalgaon Baswant Nashik
Share on Social Sites

नाशिक । Nashik :

जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथील एका तरुणाला दोनदा वाचवूनही अखेर त्याने आज कादवा नदीत (Kadva River) उडी घेत स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

राकेश आहेर (26) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, याच तरुणाने गेल्या काही दिवसांपूर्वी कादवा नदीच्या पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता.

Nashik Crime : कुलसचिव पिता, डॉक्टर पुत्राचा निर्घृण खून, दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरले : ‘अशी’ झाली गुन्ह्याची उकल

त्याचवेळी त्याला तेथेच उपस्थित दोन तरुणांनी वाचवले होते वाचविण्यात आले होते, त्या नंतर कालच (दि. 13) राकेशने जळत्या चितेत उडी मारल्याची घटना घडली होती.

यावेळी देखील या तरुणाला नातेवाईकांनी वाचवले होते, मात्र आज (दि. 14) सकाळी या तरुणाने पुन्हा एकदा कादवा नदीच्या पुलावरून उडी मारली आणि यात त्याचा करुन अंत झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

‘तो’ नदीत उडी मारणार तेच तरुणाने धाव घेऊन हात पकडला, पाहा नाशिकचा थरारक VIDEO

पिंपळगाव बसवंत येथील ही घटना असून कालच्या तरुणाने जळत्या चितेवर उडी मारण्याची घटना घडली होती. पिंपळगाव बसवंत येथील अमरधाम (Pimpalgaon Baswant, Amardham) मध्ये अंत्यसंस्कारासाठी काही जण आले होते.

त्यावेळी उरकल्यानंतर नातेवाईकांनी घराची वाट धरली. मात्र तितक्यात या राकेशने चितेवर उडी मारली. हे पाहताच घराकडे निघालेल्या नातेवाईकांनी चितेकडे धाव घेत त्या तरुणाला बाहेर काढले.

Nashik Crime : ‘ताे’ हाडांचा सांगाडा डाॅ. सुवर्णा वाजे यांचाच; खून झाल्याचे निष्पन्न

आज पुन्हा या राकेशने ने कादवा नदीच्या पुलावरून उडी मारत जीवनयात्रा संपवली आहे. तर काही दिवसांपूर्वी याच तरुणाने याच कादवा नदीच्या पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याला वाचण्यात आले होते, मात्र आजची उडी त्याची अखेरची उडी ठरली आहे. दरम्यान या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीसांत (Pimpalgaon Baswant Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढदिवसाच्‍या पार्टीने केला घात.. दोघांचा जागीच मृत्यू; खान्देशातील घटना

See also  'या' गावात एकामागून एक सहा मैत्रिणींनी सोबत घेतलं विष, कारण जाणून तुम्हीही म्हणाल-अरे देवा!

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites