अनिल परब ED च्या जाळ्यात; ‘या’ 7 ठिकाणी छापेमारी

अनिल परब ED च्या जाळ्यात; 'या' 7 ठिकाणी छापेमारी l ED raids Shivsena leader Anil Parab seven locations in Pune and Mumbai
अनिल परब ED च्या जाळ्यात; 'या' 7 ठिकाणी छापेमारी l ED raids Shivsena leader Anil Parab seven locations in Pune and Mumbai
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Shiv Sena leader and State Transport minister Anil Parab) यांच्या मालमत्तांवर ईडीकडून (Enforcement Directorate ED) धाड टाकण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू करण्यात आलं आहे. (ED raids on Maharashtra Minister Anil Parab properties in Mumbai, Pune)

वेश्या व्यवसाय कायदेशीर.. ‘सेक्स वर्कर्स’च्या कामात पोलीसांनी हस्तक्षेप करता कामा नये

मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आलं आहे. त्यासोबतच वांद्रे (Bandra) येथील त्यांच्या निवासस्थानी आणि दापोलीतही (Dapoli) ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली असल्याचं वृत्त समोर येत आहे. ANI च्या वृत्तानुसार, अनिल परबांच्या पुण्यातील मालमत्तांवरही ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री अनिल परब हे वांद्रे येथील घरी नसल्याची माहिती मिळत आहे. ED चे अधिकारी आले तेव्हा अनिल परब घरी नव्हते. वांद्रे येथील अनिल परब यांच्या घरी ED च्या अधिकाऱ्यांसोबत CRPF चे सुरक्षा रक्षक उपस्थित आहेत.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाडसत्र सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगामी महानगरपालिकेपूर्वी झालेल्या या कारवाईमुळे शिवसेनेला एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

शाळेत अंदाधुंद गोळीबार; 18 विद्यार्थ्यांसह एकूण 21 जणांनी गमावला जीव

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीकडून अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये अनिल परब यांच्या घराचाही समावेश आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच अनिल परब यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे.

प्रतीक्षा संपली! KTM RC 390 चे नवीन मॉडेल लाँच; जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरचं काही

सचिन वाझे (Sachin Waze) याने ईडीला माहिती दिली होती की, अनिल परब यांना त्याने एक मोठी रक्कम दिली होती. याशिवाय पोलीसांच्या बदल्यांसाठी पैसे घेतले होते. तसेच काही कंत्राटदारांकडूनही वसुलीही करण्याची जबाबदारी अनिल परब यांनी सचिन वाझेला दिली होती. त्या प्रकरणात चौकशी आता ईडी करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ही धाड टाकण्यात आली आहे.

परबांवर आरोप आणि छापेमारी

अनिल परब हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. या रिसॉर्ट प्रकरणात किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. याच अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणात परब यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला. काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांच्याशी संबंधित काही व्यक्तींवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती.

See also  Rakesh Jhunjhunwala Passes Away : स्टॉक मार्केटचे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचं निधन

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  यशवंत जाधवांची 'मॅरेथॉन चौकशी' संपली; 100 तासांनंतर घरातून निघाले IT अधिकारी

Share on Social Sites