दुर्दैवी! दोन वेळा जीवदान… अखेर ‘त्या’ ने संपवलीच जीवनयात्रा
धुळे l Dhule :
मुंबई-आग्रा महामार्गावर टोल नाक्याजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 2 तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. (Two Youths killed in motorcycle Accident)
बापरे! अख्या महाराष्ट्रात 8 तास राहणार अंधार?; आता घरातही नसणार लाईट
मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) झालेल्या दुर्देवी अपघातात पार्थ सुनील सोनार (वय 15) (Parth Sunil Sonar) व निल धर्मेंद्र पटेल (Neal Dharmendra Patel) (वय 20) या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
…अन् किर्तनकार बाबाचा Porn Video असा झाला तुफान व्हायरल; खरं कारण आलं समोर
तर त्यांच्यासोबत असलेला एक तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयामध्ये (Dhule Civil Hospital) उपचार सुरू आहे. दोन्ही तरुण शिरपूर (Shirpur) येथील रहिवासी होते. दोघांच्या अचानक जाण्याने परिवारावर शोककळा पसरली आहे. परिसरासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
खान्देश हादरले.. ब्युटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार; Facial साठी हॉटेलवर बोलावून..
वाढदिवसाच्या पार्टीचे जेवण…
एक दिवस आधी झालेल्या वाढदिवसाची पार्टीचे जेवण करण्याच्या निमित्ताने मुंबई-आग्रा महामार्गावरून दुचाकीने हे तीघे मित्र जात होते. या दरम्यान अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील दोघाही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी व या तरुणांचा मित्रांनी रुग्णालयामध्ये धाव घेतली. परंतु तोपर्यंत डॉक्टरांनी या दोघांना मृत घोषित केले होते.
…अन् झोका देणे जीवावर बेतले, 6 महिन्याच्या भावासह बहिणीचा अंत; खान्देशातील हृदयद्रावक घटना