
नाशिक l Nashik :
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona Third Wave) पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU) ५६ शिक्षणक्रमांच्या सत्र परीक्षा (हिवाळी) ऑनलाईन (Online) (YCMOU Session Examination of 56 Courses (Winter) Online) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुक्त विद्यापीठाच्या या परीक्षांना मंगळवारपासून (दि. ८) सुरूवात होणार आहे.
या परीक्षेत राज्यभरातील ७७ हजार ७८९ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी प्राॅक्टर्ड या आधुनिक पद्धतीचा अवलंब केला असून परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालींवर सॉफ्टवेअर (Software) व वेब कॅमेऱ्याद्वारे (Web Camera) देखरेख ठेवली जाईल. कॅमेऱ्यासमोर हालचाल झाल्यास सॉफ्टवेअर वाॅर्निंग देईल. विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिकच्या वॉर्निंग दिली जाईल. त्यानंतर परीक्षा आपोआप बंद होईल.
ओमायक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नवीन विषाणूचा वाढता धोका लक्षात घेत मुक्त विद्यापीठाने हिवाळी सत्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीने (YCMOU winter session exams online) घेण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२२ च्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या ऑफलाईन परीक्षा विद्यापीठाने रद्द केल्या आहे.
ऑनलाईन परीक्षा ८ ते २५ फेब्रुवारी दरम्यान घेतल्या जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सहामाही अर्थात प्रमाणपत्र परीक्षा आणि ५६ सत्रनिहाय अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा दरवर्षी जानेवारीमध्ये होतात. चालू शैक्षणिक वर्षाची परीक्षा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले होते.
मात्र, ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याने या सत्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. शिक्षणक्रमनिहाय परीक्षेचे वेळापत्रक मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यूक्रेनवर ७२ तासांत रशियाचा कब्जा, १९ हजार जवानांसह ५० हजार लोकांचा मृत्यू?