
नाशिक l Nashik :
गॅस गिझरच्या गळतीमुळे (Gas Geyser Leak Death) पायलट महिलेला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना (Nashik Pilot Lady Death in Bathroom) समोर आली आहे.
गॅस गिझरमधून वायू गळती (Gas Geyser leakage) झाल्यामुळे महिलेचा गुदमरुन मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रश्मी गायधनी (Rashmi Gaidhani) या मुंबईत एअर इंडियामध्ये (Air India) वैमानिक म्हणून कार्यरत होत्या.
नाशिकमध्ये (Nashik) घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. रश्मी गायधनी एअर इंडियामध्ये सिनिअर पायलट म्हणजेच ज्येष्ठ वैमानिक (Rashmi Gaidhani, senior pilot, Air India) होत्या.
आंघोळीच्या वेळी गॅस गिझरमधून गळती झाल्यामुळे बाथरुममध्येच गुदमरुन गायधनी यांचा करुण अंत झाला. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
रुको जरा सबर करो; सातवी पास ‘भाऊ’ च्या न्यायालयीन कोठडीत तब्बल ‘इतक्या’ दिवसांची वाढ