
कीव l Kyiv :
रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्या सीमेवर सध्या प्रचंड तणावाची परिस्थिती आहे. रशिया कधीही यूक्रेनवर हल्ला (Russia attack Ukraine) करण्याच्या तयारीत आहे. जर पुतीन (Putin) यांनी आदेश दिले तर रशियन सैन्य ७२ तासांत यूक्रेनची राजधानी कीववर कब्जा करु शकते.
यूक्रेनवर रशियाने हल्ला केल्यास यूक्रेनचे १५ हजार सैन्य जवान आणि रशियाचे ४ हजार जवानांचा मृत्यू होऊ शकतो असे अमेरिकन सैन्याचे चेअरमन ऑफ जॉईंट चीफ्स ऑफ स्टाफ जनरल मार्क (US Army Chairman of the Joint Chiefs of Staff General Mark) यांनी सांगितले आहे.
इतकचे नाही तर या युद्धामुळे ५० हजार सर्वसामान्य लोकांचाही जीव जाऊ शकतो असे गुप्तचर यंत्रणेने अलर्ट केले आहे. जनरल मार्क यांनी अमेरिकेच्या खासदारांना सांगितले की, रशिया जर त्यांच्या ताकदीने यूक्रेनवर हल्ला करत असेल तर ७२ तासांत ते कब्जा करु शकतात.