मोठी बातमी : ‘या’ कारणामुळे मंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

'या' कारणामुळे मंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा l Mainister Bachchu Kadu two months rigorous imprisonment
'या' कारणामुळे मंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा l Mainister Bachchu Kadu two months rigorous imprisonment
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) अजून एक मंत्री अडचणीत आले आहे. राज्य सरकारमधील महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Minister of State for Women, Child Welfare and Education Bachchu Kadu) यांना कोर्टाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याप्रकरणी बच्चू कडू यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी भाजपाचे तत्कालीन नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी २०१७ मध्ये बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दिली होती.

त्यावर न्यायालयीन सुनावणी झाल्यानंतर या प्रकरणाचा आज निकाला आला आहे. त्या चांदूरबाजार येथील प्रथमवर्ग न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Airtel Down : देशभरात ब्रॉडबँड ते मोबाईल नेटपर्यंत Airtel च्या सर्व सेवा ठप्प; कंपनीने दिली ‘हि’ महत्वपूर्ण माहिती

बच्चू कडू यांच्याकडे मुंबईत सुमारे ४२ लाख ४६ हजार रुपयांचा स्वत:च्या मालकीचा फ्लॅट होता. मात्र २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडुकीत त्यांनी या फ्लॅटची माहिती लपवून ठेवली होती.

दरम्यान, त्यावरून तक्रार करणारे गोपाल तिरमारे (Gopal Tiramare) यांनी माहितीच्या अधिकारामधून याबाबतची माहिती मिळवली होती. त्याआधारावर त्यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

दुर्दैवी!; नाशिक-नंदुरबार एसटी बसने विद्यार्थिनीला चिरडले

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात अंधेरी येथे २०११ मध्ये सदनिका विकत घेतली परंतु ही माहिती त्यांनी शपथ पत्रात दडविली होती. या गंभीर प्रकरणी चांदूरबाजार तालुक्याचे भाजप सरचिटणीस गोपाल तिरमारे (BJP General Secretary Gopal Tiramare) यांनी दि. २७ डिसेंबर २०१७ रोजी आसेगाव पोलिसात (Asegaon Police) तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी पाच वर्षांनी शुक्रवारी चांदूरबाजार (Chandur Bazar) येथील प्रथम श्रेणी दिवाणी न्यायालय क्रमांक १ यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांची शिक्षा आणि २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी सरकारी वकील वानखडे यांनी बाजू मांडली.

See also  धक्कादायक! महिलेनेच आखला प्लॅन; अल्पवयीन मुलीवर ८ जणांकडून बलात्कार

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  दुःखद! बिहारमध्ये वीज पडून 33 जणांचा मृत्यू

Share on Social Sites