मुंबई l Mumbai :
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी (SSC and HSC class students agitation) भडकावल्याप्रकरणी केवळ सातवी पास शैक्षणिक पात्रता असलेल्या विकास पाठक (Vikas Pathak) ऊर्फ हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) याने न्यायालयात माफी मागितली आहे.
पाठक आणि इकरार खान (Ikrar Khan) या दोघांना मंगळवारी (०१ फेब्रुवारी) वांद्रे न्यायालयाने (Bandra court) ०४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विकास पाठक आणि इकरार खान यांना पाेलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले. विकास पाठकला समाजमाध्यम हाताळण्याप्रकरणी (Social Media) निधी कुणी पुरवाला याची चौकशी करण्यासाठी काेठडीची मागणी पाेलिसांनी केली.
Video : ‘हिंदुस्थानी भाऊ’ला अटक होणार; विद्यार्थ्यांना चिथवल्याचा आरोप
सुमारे ३ लाख युजर्सनी पाहिले व्हिडिओ (About 3 lakh users watched the video)
दहावी-बारावी परीक्षा ऑनलाइन (10th-12th Online Exams) घ्याव्यात यासाठी आंदोलन करण्याचे आवाहन विकास पाठक याने दि. २४ जानेवारी रोजी समाजमाध्यमांवर केले होते. दोन लाख ७७ हजार युजरनी पाठकच्या त्या चित्रफिती पाहिल्या होत्या. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी मुंबईसह राज्यभरात विद्यार्थी आंदोलने झाली होती.
Nashik Crime : असा झाला ‘त्या’ खुनाचा उलगडा; पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा