नागपूर l Nagpur :
पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Police Commissioner Amitesh Kumar) यांनी 17 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. आजारी असल्याच्या कारणाने किंवा इतर कुठल्याही कारणाने गेल्या सहा महिन्यापेक्षा जास्त काळ सुट्टीवर असलेल्या आणि वारंवार सूचना देऊनही कर्तव्यावर रुजू न झालेल्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
कोणतेही ठोस कारण न देता वारंवार कामावर गैरहजर राहणाऱ्या तब्बल 17 पोलीसांना नागपूर पोलीस (Nagpur Police) आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे.
बापरे! अख्या महाराष्ट्रात 8 तास राहणार अंधार?; आता घरातही नसणार लाईट
आरोग्य आणि अन्य रजा घेऊन सतत कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या पोलीसांची यादी तयार करण्यात आली होती. यात अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. (Nagpur Police Commissioner suspended seventeen Police Personnel)
दरम्यान, वारंवार गैरहजर राहणाऱ्या या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर काही कर्मचारी हजर झाले मात्र जे हजर झाले नाहीत ते ठोस कारण देऊ शकले नसल्यानं, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
SBI युजर्स सावधान, एका क्लिक आणि बँक खाते होईल रिकामे; Yono SMS द्वारे होतोय नवीन Scam
वारंवार गैरहजर राहणाऱ्या सतरा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून काही कर्मचारी निलंबनाच्या मार्गावर असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकाच वेळी 17 पोलीस कर्मचारी निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकंदरीत या कारवाईने पोलीस कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
धुळे : खळबळजनक.. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील तब्बल 68 पोलिसांना जेवणातून विषबाधा
See also Blog (विशेष लेख) : उद्धवजी, सरकार विषयीच्या सहानुभूतीला 'घर-घर' लागेल असे निर्णय घेऊ नका...