
मुंबई l Mumbai :
मुंबईतल्या धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad, Dharavi, Mumbai) यांच्या घराबाहेर इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनाला तोडफोडीचे गालबोट लागले असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना जमावाला थोपण्यासाठी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला आहे.
https://www.instagram.com/tv/CZYza9eFPdX/?utm_source=ig_web_copy_link
धारावीत दहावी (Standard 10th), बारावीच्या (Standard 12th) हजारो विद्यार्थ्यांचा जमाव कसा झाला? त्यांना नेमके कुणी बोलावले होते? याची माहिती विद्यार्थ्यांना विचारण्यात आली असता अनेकांनी ‘हिंदुस्थानी भाऊ’ (Hindustani Bhau) चे नाव घेतले आहे. ‘हिंदुस्थानी भाऊ’ धारावीत आंदोलनात सहभागी (Dharavi Agitation) देखील झाला होता याचा व्हिडिओ त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवर (Instagram account) देखील पाहायला मिळत आहे.
चिथावणीखोर ‘सातवी पास भाऊ’ची न्यायालयात माफी; ‘या’ तारखे पर्यंत पोलीस कोठडी
https://www.instagram.com/tv/CZYw9CYFbV0/?utm_source=ig_web_copy_link
राज्यात केवळ धारावीतच नव्हे, तर नागपूर (Nagpur), सातारा (Satara), नाशिक (Nashik) इतर काही ठिकाणी देखील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे हे नियोजन करुन आंदोलन करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच हिंदुस्थानी भाऊच्या इन्स्टाग्राम अकाऊंट (Hindustani Bhau Instagram account) देखील त्याचे काही व्हिडिओ समोर आले आहे.
या व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau Video) धारावीत आंदोलनात सामील झाला होता आणि त्यानंच केलेल्या आवाहनानंतर विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणात जमा झाले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
https://www.instagram.com/tv/CZYsswsFS31/?utm_source=ig_web_copy_link
‘हिंदुस्थानी भाऊ’चा पोलिसांकडून अटक होणार (Police search for ‘Hindusthani Bhau’)
हजारो विद्यार्थी नियोजन पद्धतीने शिक्षण मंत्र्यांच्या घराबाहेर जमा होऊन तोडफोड केल्याच्या या घटनेमागे ‘हिंदुस्थानी भाऊ’ असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील ‘हिंदुस्थानी भाऊ’चा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. ‘हिंदुस्थानी भाऊ’च्या सांगण्यावरून ही गर्दी येथे जमली. तसेच हे ठरवून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना भडकावण्यात आले आहे. तसेच, हिंदुस्थानी भाऊ विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
https://www.instagram.com/tv/CZYp7NlFtTN/?utm_source=ig_web_copy_link