पुणे l Pune :
ऐन हिवाळ्यात गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान काही ठिकाणी झालेल्या गारपिटीने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
असे असताना राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहे. यासोबतच पुढील चोवीस तासांत अरबी समुद्रात (Arabian Sea) वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यासोबतच कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
► Fairly widespread/widespread light/moderate rainfall very likely over Northeast India during 23rd-25th January. Isolated thunderstorm with lightning very likely over the region during next 3 days and isolated hailstorm on 23rd January.
— India Meteorological Department (@Indiametdept) January 22, 2022
हवामान खात्याने आज मुंबईसह (Mumbai) पुणे (Pune), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), नाशिक (Nashik), अहमदनगर (Ahmednagar), जळगाव (Jalgaon), धुळे (Dhule)आणि नंदुरबार (Nandurbar) या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज सकाळपासून याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.
त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यासोबतच दक्षिण गुजरात (South Gujarat) आणि लगतच्या मध्य प्रदेशात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही भागांत पावसाला सुरुवात देखील झाली आहे.