‘गेम’चा नाद लई बेक्कार! बापाच्या मृत्यु पश्चात माय माऊलीने 36 लाख जमवले पण मुलाने झटक्यात उडवले

'गेम'चा नाद लई बेक्कार! बापाच्या मृत्यु पश्चात माय माऊलीने 36 लाख जमवले पण मुलाने झटक्यात उडवले l Hyderabad boy looses 36 lakh Repees for playing Free Fire Online mobile game
'गेम'चा नाद लई बेक्कार! बापाच्या मृत्यु पश्चात माय माऊलीने 36 लाख जमवले पण मुलाने झटक्यात उडवले l Hyderabad boy looses 36 lakh Repees for playing Free Fire Online mobile game
Share on Social Sites

नवी दिल्ली l New Delhi :

ऑफलाईन गेमसह (Online Game) ऑनलाईन गेमची (Offline Game) शालेय मुलांपासून तर महाविद्यालयीन तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. याच नादापायी अनेक धक्कादायक घटना घडल्याचं देखील अनेक वेळा समोर आलं आहे. अशीच एक भयंकर घटना हैद्राबादमध्ये (Hyderabad) घडली आहे. (Hyderabad boy looses 36 lakh Repees for playing Free Fire Online mobile game)

एका 16 वर्षीय मुलाने मोबाईलवर ऑनलाईन गेमच्या नादात थोडे थोडके नव्हे तर तब्बल 36 लाखांचं नुकसान केलं आहे. हैद्राबादमधील अंबरपेट (Amberpet, Hyderabad) भागात राहणाऱ्या या मुलाने ऑनलाईन गेमचे पैसे भरण्यासाठी आपल्या आईच्या बँक खात्याचा वापर केला.

भीषण दुर्घटना! भाविकांची बस दरीत कोसळली; 26 जण जागीच ठार, 3 जखमी

हैद्राबाद पोलीसांच्या सायबर गुन्हे (Hyderabad Police Cyber ​​Crime Branch) शाखेनुसार, मुलाने आपल्या आजोबांच्या मोबाईलवर एक फ्री फायर गेमिंग एप (Free Fire Gaming App) डाउनलोड केला होतं. गेम खेळण्यासाठी सुरुवातीला 1500 रुपये आणि नंतर बँक खात्यातून 10 हजार रुपये लागणार होते. त्याला खेळाचं व्यसन लागल्यानंतर तो कुटुंबाला न सांगता यासाठी गुपचूप पैसे खर्च करू लागला. एका दिवंगत पोलीस अधिकाऱ्यांचा अकरावीत शिकणारा हा मुलगा 1.45 लाख रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंत पैसे भरत होता.

जेव्हा त्याची आई पैसे काढण्यासाठी SBI बँकेत गेली, तर त्यात पैसे नसल्याचं कळालं. हे ऐकताच तिला जबर धक्का बसला. खात्यातून एकूण तब्बल 27 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. यानंतर तिने HDFC बँकेतून खात्याचा तपास केला तर त्यातूनही 9 लाख रुपये गायब झाले होते. महिलेने सायबर क्राइमकडे (Cyber ​​Crime) याबाबत तक्रार केली. तिने पोलीसांना सांगितलं की, पतीच्या मृत्यूनंतर आलेली रक्कम तिने दोन बँकेत ठेवली होती. मात्र मुलाच्या कारनाम्याने सर्व परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

See also  नाशिकच्या महापालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली; 'या' घोटाळ्याचं प्रकरण भोवल्याची शक्यता

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites