सहा वाहनांचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर सहा वाहनांचा विचित्र अपघात; चौघांचा जागीच मृत्यू l Mumbai Pune Expressway major Accident
मुंबई-पुणे एक्सप्रेसवर सहा वाहनांचा विचित्र अपघात; चौघांचा जागीच मृत्यू l Mumbai Pune Expressway major Accident
Share on Social Sites

पुणे l Pune :

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर आज (दि. १५) रोजी भीषण अपघात (Major accident on Mumbai-Pune Expressway) झाला आहे. सहा गाड्या एकमेकांना धडकल्याने विचित्र अपघात (six vehicle rammed into each other) झाला आहे.

या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या लेनवरील खोपोली जवळ हा भीषण अपघात (Accident near Khopoli) झाला आहे.

कार, कंटेनरसह चार वाहनांचा अपघात झाला आहे. दोन कंटेनरच्या मधोमध कार अडकल्याने अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, चार जणांचा जागीच मत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे आणि पाच किरकोळ जखमी झाले आहे.

सौ बात की एक बात : आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?; वाचा सविस्तर

जखमींना पनवेलच्या एम जी एम रूग्णालयात (MGM Hospital, Panvel) दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा दल (Maharashtra Security Force), देवदूत रेस्क्यू टीम (Devdoot Rescue Team) आणि खोपोली (Khopoli), खंडाळा (Khandala), महामार्ग पोलीस दाखल झाले आहेत. या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्याप या अपघाताचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही.

Maratha Reservation : ठरलं! मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती ‘या’ तारखे पासून आमरण उपोषण करणार

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील अपघातातील मृतांची नावे (Names of the victims of the accident on the Mumbai-Pune Expressway)

1) गौरव खरात (वय ३६)

2) सौरभ तुळसे (वय-३२)

3) सिद्धार्थ राजगुरू (वय-३१)

4) मयूर दयानंद कदम, (तुळजापूर)

या सहा गाड्यांमध्ये झाला विचित्र अपघात

एकूण सहा गाड्यांमध्ये हा अपघात झाला आहे. यामध्ये दोन कंटेनर (containers), एक वेन्यू कार (Venue car), एक ट्रक (Truck), एक आयशर टेम्पो (Eicher Tempo) आणि एका स्विफ्ट गाडीचा (Swift Car) समावेश आहे. या अपघातात वेन्यू कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेशला न्यायालयाने सुनावली ‘हि’ शिक्षा, एकतर्फी प्रेमातून तरुणीला जिवंत जाळल्याप्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल

भरधाव कंटेनर पलटी होऊन रिक्षाचा चेंदामेंदा

काही दिवसांपूर्वी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला होता. दि. ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. भरधाव कंटेनर वळणा पलटी झाला आणि १५ ते २० फूट दूर फरफटत गेला. या अपघातात कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा भीषण अपघात तेथील CCTV त कैद झाला आहे. अंगावर काटा आणणारा हा सीसीटीव्ही आता समोर आला आहे.

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र (Khandala Police Training Center) साठे मिसळ (Sathe Misal) जवळ पुण्यावरून मुंबईकडे अतिवेगाने जाणारा कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. त्याच वेळेस खंडाळ्यातून लोणावळच्या दिशेने जाणाऱ्या पॅसेंजर रिक्षाला या कंटेनरची धडक बसली. या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

See also  Today Rashibhavishya 10 August 2022 : 'या' राशींसाठी खूप चांगला जाणार आजचा दिवस, जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशिभविष्य

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites