नाशकात RTI कार्यकर्त्यावर गोळीबार; भररस्त्यात थरार

नाशकात RTI कार्यकर्त्यावर गोळीबार; भररस्त्यात थरार l Crime news Firing on RTI activist Prashant Jadhav Nashik Nasik
नाशकात RTI कार्यकर्त्यावर गोळीबार; भररस्त्यात थरार l Crime news Firing on RTI activist Prashant Jadhav Nashik Nasik
Share on Social Sites

नाशिक l Nashik :

नाशिकमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गोळीबार (RTI Worker Firing in Nashik) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात प्रशांत जाधव (Prashant Jadhav) जखमी झाले आहेत.

नाशिक शहरातील नवीन नाशिक भागात (Nashik Crime) असलेल्या उपनगर परिसरात (Upnagar) काल सोमवारी (दि. १४) रात्री ही घटना घडली.

खळबळजनक! जिल्ह्यात तब्बल २० शाळा बोगस

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात जाधव यांच्या मांडीला एक गोळी लागली तर दुसरी गोळी पोटाला चाटून गेली आहे. जखमी प्रशांत जाधव यांच्यावर खाजगी रुग्णालयात (Nashik Civil Hospital) उपचार सुरु आहेत. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.

Google Dog : शाब्बास! नाशिक पोलिस श्वान पथकातील ‘गुगल’ने शाेधली अपहृत अकरा वर्षांची मुलगी

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असलेले आणि एका पक्षाचे पदाधिकारी असलेले प्रशांत जाधव यांच्यावर नाशिकमधील एका मेडिकल स्टोअरजवळ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात जाधव जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हल्ल्यात प्रशांत जाधव जखमी

गोळीबारात जाधव यांच्या मांडीला एक गोळी लागली तर दुसरी गोळी पोटाला चाटून गेली. हा गोळीबार नेमका कोणी आणि का केला? याचा तपास पोलीस करत आहेत. परिसरातील सीसी टीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे नवीन नाशिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रेयसीने पेटवून दिलेल्या ‘त्या’ युवकाचा अखेर मृत्यू; Valentine Day च्या दिवशी घडलेल्या घटनेने हळहळ

See also  दहावी-बारावीच्या परीक्षा Offline की Online ?, याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला 'हा' मोठा निर्णय

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  यूक्रेनवर ७२ तासांत रशियाचा कब्जा, १९ हजार जवानांसह ५० हजार लोकांचा मृत्यू?

Share on Social Sites