मुंबई l Mumbai :
मुंबईत महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली होती. (Maharashtra Board’s 12th class chemistry paper leak) काही विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळली असून ते परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले होते.
त्यानंतर विलेपार्ले पोलिसांनी (Vile Parle Police) मालाड (Malad) येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केल्याचे वृत्त होते. मात्र, रसायनशात्राचा (Chemistry Paper) पेपर फुटला नाही, या बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिले आहे.
शनिवार, दिनांक १२ मार्च रोजी झालेल्या इ. बारावीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू आहे. त्यात तथ्य नाहीं. या प्रकरणी आज विधानपरिषदेत मी केलेलं निवेदन. pic.twitter.com/5TnlPxChek
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 14, 2022
“काल (शनिवारी) दि. १२ मार्च रोजी झालेल्या इयत्ता बारावीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही,” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत (Legislative Council) दिली.
तयारीला लागा! राज्यात 7,231 पदांसाठी पोलीस भरती होणार; राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील