अहमदनगर l Ahamadnagar :
कंटेनरने ॲपेरिक्षाला दिलेल्या जोराच्या धडकेत सहा जण जागीच ठार झाले. ही घटना कोपरगाव महामार्गावर (Kopargaon Highway) पगारे वस्तीनजीक (Pagare Vasti) आज (दि. 06) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. (Terrible accident of Container and Ape Rickshaw in Ahmednagar Six people died on the spot)
अपघात इतका भीषण होता की, ॲपेरिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात दोन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनींचाही मृत्यू झाला आहे. तसेच दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहे.
मालट्रक आणि कारच्या समोरासमोरील धडकेत दोंडाईच्यातील व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू