
कॅप्टन रोहित शर्माच्या (Captain Rohit Sharma) फुल टाईम नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिली वन डे मालिका जिंकली आहे. (Indian team won the first ODI series) भारताने ३-० अशा फरकाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) मालिकेत निर्भेळ यश मिळवले आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) व रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी भारताचा डाव सावरल्यानंतर दीपक चहर (Deepak Chahar) व वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांनी तळाला धावांत चांगले योगदान दिले.
त्यानंतर गोलंदाजीतही चहरने (Bowler Chahar) कमाल केली. यावेळेत त्याला प्रसिद्ध कृष्णा (Krishna) व पुनरागमन करणारा कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांची चांगली साथ मिळाली. भारताने तिसरा वन डे सामने ९६ धावांनी जिंकला. प्रसिद्ध व मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर कुलदीप, दीपक चहर यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. भारतीय संघाने प्रथमच वेस्ट इंडिजवर वन डे मालिकेत निर्भेळ यश मिळवले.
रिषभ पंत (Rishabh Pant) व श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी भारताचा डाव सावरला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाचा सामना करताना या जोडीने ११० धावांची महत्त्वाची भागीदारी केली. त्यानंतर दीपक चहरने (Deepak Chahar) तळाचा चांगली फटकेबाजी करून भारतासाठी धावांचा डोंगर उभा केला.
https://twitter.com/BCCI/status/1492161666066583554
वॉशिंग्टन सुंदरही चांगला खेळला. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) ही जोडी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा सलामीला खेळताना दिसली. अल्झारी जोसेफने (Alzari Joseph) रोहितचा (१३) त्रिफळा उडवला आणि विराट कोहलीला (Virat Kohli) भोपळ्यावर माघारी पाठवले. त्यानंतर धवनही माघारी परतला. ३ बाद ४२ धावा अशी अवस्थआ असताना रिषभ पंत (Rishabh Pant) व श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी दमदार खेळी करताना ११० धावांची भागीदारी केली.
पंत ५४ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार मारून ५६ धावांवर माघारी परतला. भारताची चौथी विकेट १५२ धावांवर पडली. चांगल्या फॉर्मात असलेला सूर्यकुमार यादव आज अपयशी ठरला, त्याला ६ धावांवर फॅबियन अँलेनने बाद केले. श्रेयस १११ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ८० धावांवर बाद झाला. दीपक चहरने ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३८ धावा करून माघारी परतला. वॉशिंग्टनने ३३ धावा केल्या आणि भारताला १० बाद २६५ धावांचा पल्ला गाठून दिला.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची सुरूवात निराशाजनक झाली. मोहम्मद सिराजने तिसऱ्याच षटकात शे होपला बाद केले. त्यानंतर दीपक चहरने विंडीजचे दोन फलंदाज बाद करताना त्यांची अवस्था ३ बाद २५ अशी केली. ब्रेंडन किंग्स (१४) व शमर्ह ब्रुक्स (०) हे एकाच षटकात बाद झाले. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने अचूक मारा करताना निकोलस पूरन व डॅरेन ब्राव्हो ही सेट झालेली जोडी तोडली. प्रसिद्धने टाकलेल्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर ब्राव्होने (१९) हलका फटका मारला आणि स्लिपमध्ये उभ्य असलेल्या विराट कोहलीने तो सुरेखरित्या टिपला. जेसन होल्डरलाही (६) प्रसिद्धने तंबूत पाठवले. पुढील षटकात कुलदीप यादवने फॅबियन अँलेनची (०) विकेट घेत विंडीजची अवस्था ६ बाद ७६ अशी केली.
https://twitter.com/BCCI/status/1492158022139125764