
मुंबई l Mumbai :
इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये (Indian Premier League 2022 Mega Auction) पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंची लॉटरी लागली. तर काहींना कुणीही खरेदी केले नाही. ऑक्शन सुरू झाल्यानंतर पहिल्या २ तासांमध्ये खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्वच टीममध्ये चढाओढ होती.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या टीमने लंचपर्यंत एकालाही खरेदी केले नाही. त्यांनी लंचनंतर खेळाडूंवर मोठी बोली लावली.
चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) पहिल्या सिझनपासून असलेल्या अनुभवी सुरेश रैनावर (Suresh Raina) मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी कुणीही बोली लावली नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्ह स्मिथलाही (Australia Captains Steve Smith) पहिल्या दिवशी निराशा सहन करावी लागली. हे दोघेही यापूर्वी वेगवेगळ्या आयपीएल टीमचे कॅप्टन होते. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा बॅटर डेव्हिड मिलरलाही (South African batsman David Miller) पहिल्या दिवशी कुणी खरेदी केले नाही.
Money, money, money 💰 https://t.co/x4RmClqn0z | #IPLAuction pic.twitter.com/mBViDvu1Er
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 13, 2022
अनसोल्ड खेळाडूंचे काय होणार? (What will happen to IPL unsold players?)
ऑक्शनच्या पहिल्या दिवशी अनसोल्ड असलेल्या खेळाडूंवर आज (रविवार) पुन्हा एकदा बोली लागू शकते. या सर्व खेळाडूंचा एक्सलरेटर ऑक्शनमध्ये (Accelerator Auction) समावेश होतो. त्याचबरोबर एखाद्या फ्रँचायझीची लिस्ट पूर्ण झाली नाही अनसोल्ड प्लेयर्सचा त्या फ्रँचायझी टीममध्ये समावेश करू शकतात.
पण, त्यावेळी त्यांना त्या खेळाडूंच्या बेस प्राईज इतकी रक्कम देणे भाग आहे. त्याचबरोबर स्पर्धेसाठी उपलब्ध नसलेल्या किंवा जखमी खेळाडूंच्या बदली देखील अनसोल्ड खेळाडूंशी फ्रँचायझी करार करू शकतात.
Number crunching to continue today here in Bengaluru 😎💪#TATAIPLAuction @TataCompanies pic.twitter.com/UhwKHfuJFG
— IndianPremierLeague (@IPL) February 13, 2022