IND vs ENG 3rd ODI : भारताने सीरीज जिंकली, हार्दिक-ऋषभने इंग्लंडच्या गोलंदाजांना धु.. धु.. धुतलं; पाहा हायलाईट्स

IND vs ENG 3rd ODI
Share on Social Sites

मॅचेस्टर l Manchester :

मालिकावीर हार्दिक (Hardik Pandya) (4 विकेट, 71 धावा) व सामनावीर ऋषभ पंतने (Rishabh Pant) (नाबाद 125) टीम इंडियाला रविवारी इंग्लंडविरुद्ध (England Vs India) मालिका विजय मिळवून दिला. भारताने तिसऱ्या निर्णायक वनडेत इंग्लंडवर 42.1 षटकांत पाच गड्यांनी विजय साकारला. यासह भारताने तीन वनडे सामन्यांची मालिका 2-1 ने आपल्या नावे केली. (India defeated England in the final game of the three-match ODI by 5 wickets, taking the series 2-1. Rishabh Pant scored an unbeaten century and was awarded player of the match)

टीम इंडियाने आता इंग्लंड दाैऱ्यावर यजमानांविरुद्ध सलग दुसरी मालिका जिंकली. यापूर्वी भारताने टी-20 मालिका 2-1 ने जिंकली हाेती. राेहितच्या (Rahit Sharma) नेतृत्वात भारताने सातवी मालिका जिंकली. तसेच आठ वर्षांनंतर इंग्लंडवर वनडेत मालिका विजय मिळवला.

हार्दिक (4/24), युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) (3/60) व मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) (2/66) शानदार गाेलंदाजीमुळे इंग्लंडला घरच्या मैदानावरील सलग तीन वनडे सामन्यांत झटपट डाव गुंडाळावा लागला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने तिसऱ्या वनडेत 45.5 षटकांत 259 धावांवर पॅव्हेलियन गाठले. प्रत्युत्तरात भारताने 42.1 षटकांत 5 गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. हार्दिकने मालिकेत आठ बळी घेतले. त्याला मालिकावीर पुरस्काराने गाैरवण्यात आले.

See also  Video : खासगी रुग्णालयात भीषण आग; 10 जणांचा होरपळून मृत्यू

ऋषभ चौथा शतकवीर यष्टीरक्षक फलंदाज (Rishabh is the fourth century wicketkeeper batsman)

मलिक विजयामध्ये यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे मोलाचे योगदान ठरले. त्याने नाबाद 125 धावांची खेळी केली. यासह तो भारतातून वनडेत शतक साजरे करणारा चौथा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.

हार्दीकची अष्टपैलू खेळी

हार्दिकने अष्टपैलू खेळीतून मालिका विजय निश्चित केला. तिसऱ्या वनडेत 7 षटकांचा 3.24 इकॉनॉमीने 24 धावा देत 4 बळी घेतले. तसेच तीन निर्धाव षटके टाकली. त्याने वनडे करियरमध्ये पहिल्यांदाच चार बळी घेतले. याशिवाय 71 धावांची खेळी केली.

See also  शिवसेनेवर शोककळा!; बाळासाहेब ठाकरेंचे सहकारी, सच्चे शिवसैनिक सुधीर जोशी यांचे निधन

Share on Social Sites