यशवंत जाधवांची ‘मॅरेथॉन चौकशी’ संपली; 100 तासांनंतर घरातून निघाले IT अधिकारी

यशवंत जाधवांची 'मॅरेथॉन चौकशी' संपली; 100 तासांनंतर घरातून निघाले IT अधिकारी l on 4th day Income Tax Raid investigation over to BMC standing committee chief Yashwant Jadhav
यशवंत जाधवांची 'मॅरेथॉन चौकशी' संपली; 100 तासांनंतर घरातून निघाले IT अधिकारी l on 4th day Income Tax Raid investigation over to BMC standing committee chief Yashwant Jadhav
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Shivsena Standing Committee Chairman Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागाने गेल्या शुक्रवारी (दि. 25) रोजी छापा टाकला होता. आता तब्बल 100 तासानंतर चौकशी अखेर संपली आहे. गेल्या चार दिवसापासून यशवंत जाधव यांच्या घरी झडती सुरू होती. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्यांनी (BJP leader Kirit Somaiya) नवे ट्विट केले आहे.

तब्बल चार दिवसांनंतर ही चौकशी अखेर संपली आहे. शुक्रवार सकाळपासून इन्कम टॅक्स विभागाचे (Income Tax Raid) अधिकारी जाधव यांच्या घरी तळ ठोकून होते. तब्बल 100 तासानंतर आयकर विभागाचे अधिकारी आज (दि. 28) सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास परतले.

Maratha Reservation : संभाजीराजेंनी उपोषण सोडलं, राज्य सरकारकडून ‘या’ मुख्य मागण्या मान्य

या चौकशी दरम्यान मोठ्या प्रमाणात कागदपत्र (Documents), डिजिटल साधने (स्कॅनर, लॅपटॉप, हार्ड डिस्क) (Scanners, Laptops, Hard Disks) ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळतेय. आज सकळी 10 च्या दरम्यान हे सर्व आयकर विभागाचे अधिकारी (Income Tax officer) यशवंत जाधव यांच्या घरातून बाहेर पडले आहेत.

आतापर्यंत 33 ठिकाणच्या झाडाझडतीत एकूण 2 कोटींच्या रकमेसह महत्त्वपूर्ण कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. या छापेमारीच्या या पार्श्वभूमीवर यशवंत जाधव यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र या चार दिवसांच्या चौकशीत अधिकाऱ्यांच्या हाती नेमके काय लागले ते अद्याप गुलदस्त्यात आहे.

https://twitter.com/KiritSomaiya/status/1498134381210537985?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1498134381210537985%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fmumbai%2Fafter-4th-day-income-tax-raid-investigation-over-to-bmc-standing-committee-chief-yashwant-jadhav-mhpv-673612.html

See also  धक्कादायक! महिलेनेच आखला प्लॅन; अल्पवयीन मुलीवर ८ जणांकडून बलात्कार

किरीट सोमय्या यांचे ट्विट

शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी केलेल्या घोटाळ्यासंदर्भात आम्ही दि. 18 ऑगस्ट 2021 रोजी आयकर विभाग आणि ईडी (ED) कडे तक्रार दाखल केली होती, असे सोमय्या यांनी ट्विट केले आहे.

मुंबईतील माझगाव भागात असलेल्या घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु होती. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव (Yamini Jadhav) या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून (Byculla Assembly constituency) शिवसेनेच्या तिकिटावर आमदार आहे.

शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स अधिकारी सीआरपीएफ (CRPF) जवानांसह शुक्रवारी सकाळीच दाखल झाले होते. त्यानंतर त्यांची चौकशी सुरु होती. या दरम्यान मुंबई महापालिकेच्या काही कंत्राटदारांवरही आयकर खात्याने छापा टाकून कारवाई केली.

रशिया-युक्रेन युद्धाचा जबर फटका; सेन्सेक्स 16400 अंकांनी गडगडला, विक्रीचे सत्र सुरूच

See also  सौ बात की एक बात : आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?; वाचा सविस्तर

Share on Social Sites