अफगाणिस्तान हादरले! काबूलमध्ये शाळेजवळ 3 मोठे बॉम्बस्फोट, 25 ठार

Share on Social Sites

अफगाणिस्तान l Afghanistan :

राजधानी काबूलमध्ये 3 जोरदार बॉम्बस्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे 25 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहे. हे स्फोट पश्चिम काबूलमध्ये (Western Kabul) झाले आहे. पहिला स्फोट मुमताज शाळेत (Mumtaz School) झाला. या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुसरा स्फोट दुसऱ्या शाळेजवळ झाला.

या स्फोटात डझनभर लोक अडकले (Dozens of people were trapped in the blast)

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम काबूलमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये डझनभर लोक या स्फोटात अडकले. या घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला, तर डझनभर लोक जखमी झाले. या स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

अफगाणिस्तानात हवाई हल्ले (Airstrikes in Afghanistan)

विशेष म्हणजे, अफगाणिस्तानमध्ये शनिवारी पाकिस्तानी हवाई दलाने (Pakistan Air Force) हवाई हल्ले केले. पाकिस्तानी हवाई दलाच्या खोस्त (Khost) आणि कुनार (Kunar) प्रांतात हवाई हल्ल्यात 47 जण ठार झाले. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी आग्नेय खोस्त (Southeastern Khost) प्रांतातील स्पराई जिल्ह्यात आणि पूर्व कुनार (East Kunar) प्रांतातील शल्तान जिल्ह्यात (Shaltan District) वझिरिस्तानच्या निर्वासितांवर (Waziristan refugee) हवाई हल्ले केले.

दहशतवाद्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी (Strict action should be taken against terrorists)

अफगाणिस्तानने पाकिस्तानी हवाई दलाच्या कारवाईचा तीव्र निषेध केला आणि परराष्ट्र मंत्रालयाने काबूलमधील पाकिस्तानचे राजदूत मन्सूर अहमद खान (Mansoor Ahmed Khan) यांना या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून बोलावले. यानंतर पाकिस्तानने सांगितले की, अफगाणिस्तानने पाकिस्तान-अफगाण सीमेभोवतीचा (Pakistan-Afghan Border) परिसर सुरक्षित करून दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करावी.

त्याच वेळी, अफगाणिस्तानमधील संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला खावराजिमी (Inayatullah Khawrajimi) म्हणाले की, कोणत्याही देशाने अफगाणांची परीक्षा घेऊ नये. इतिहासात अफगाण लोक कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहिले नाहीत हे सिद्ध झाले आहे. अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नांगरहारमधील (Nangarhar) लोक रविवारी प्रांतातील घनिखिल जिल्ह्यात (Ghanikhil district) मोठ्या संख्येने जमले.

चिल्लरवर डल्ला! SBI मधून 11 कोटी रुपयांची नाणी गायब; CBI चौकशी सुरु

See also  How to Remove Odor From Shoes : पावसाळ्यात बुटांचा कुबट वास येतो? जाणून घ्या 'हे' 5 उपाय, दुर्गंधी होईल गायब

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Ahmedabad Serial Blast Case : एक तासात २१ स्फोट घडवले, इतिहासात पहिल्यांदाच ३८ जणांना फाशी

Share on Social Sites