रशिया-युक्रेन युद्धाचा जबर फटका ; सेन्सेक्स 16400 अंकांनी गडगडला, विक्रीचे सत्र सुरूच l Share market crash Sensex fell again by 1000 points below 55000 today stock market
Share on Social Sites
मुंबई :
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाच्या (Russia Ukraine war) पार्श्वभूमीवर भारतीय बाजारांमध्ये विक्रीचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आजही शेअर बाजारात सुरू होताच 1000 अंकांनी घसरला होता. निफ्टी (Nifty) निर्देशांक आपला सपोर्ट झोन तोडत 16300 अंकावर ट्रेड करीत होता.
रशिया -युक्रेन युद्धाचा आज (दि. 28) पाचवा दिवस आहे. जगभरातील बाजारांमध्ये गुंतवणूकदारांनी घेतलेला सावध पवित्रा घेतला आहे. भारतीय बाजारात देखील याचा परिणाम स्पष्ट दिसून आला.
आज बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 1000 अंकांनी तर एनएसईचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 200 हून अधिक अंकांनी घसरला आहे.
सकाळी बाजार सुरू होताच निफ्टी 16300 तर सेन्सेक्स 54990 अंकावर ट्रेड करीत होते. शुक्रवारी (दि. 25) निम्मे तोटा भरुन काढल्यावर आज पुन्हा आशियाई बाजारात चिंतेचं वातावरण दिसून येत आहे.